PMPML : महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे शहरात पीएमपीएमएलची विशेष बससेवा
By निलेश राऊत | Updated: April 8, 2023 17:41 IST2023-04-08T17:38:29+5:302023-04-08T17:41:17+5:30
पुणे : महात्मा फुले जयंती निमित्त मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात ...

PMPML : महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे शहरात पीएमपीएमएलची विशेष बससेवा
पुणे : महात्मा फुले जयंती निमित्त मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने गंजपेठ, कस्तुरी चौक व सोनावणे हॉस्पिटल मार्गे जाणाऱ्या बसेस जाहीर केल्या आहेत. यामध्ये स्वारगेट ते पुणे स्टेशन पर्यंत ५ अटल पुण्यदशम, ६ अटल पुण्यदशम ही बस सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट नाना पेठ मार्गे उपलब्ध आहे. याचबरोबर न.ता.वाडी ते कोंढवा खुर्द, कात्रज ते लोहगाव, धनवकडी ते पुणे स्टेशन, वाघोली ते येरवडा, येवलेवाडी ते पुणे स्टेशन, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, कात्रज ते खराडीसह तेजस्विनी अशा १९ बस सेवा महात्मा फुले वाड्यापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.