शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! शंभर कोटी रूपयांच्या खोट्या नोटा पकडून देतो सांगत पोलिसांचीच फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 19:56 IST

तोतया खबऱ्याला अटक, चौघांवर गुन्हा

शिरूर  : शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील खोट्या खबऱ्याला त्याच्या साथीदारांसह पुणे दहशतवादी पथक आणि पोलिसांनी न्हावरा फाटा(ता. शिरूर) येथून अटक केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 सिकंदर परमेश्वर राम (वय ३२ रा. आंबेडकर नगर, वरळी, मुंबई), कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के.पी. सिंग (रा. गुजरात) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींपैकी सिकंदर परमेश्वर राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २ मार्चपर्यंत आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.  त्याचे तीन साथीदार फरार झाल्याची माहीती पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली. 

 याबाबत किरण श्याम कुसाळकर दहशतवादी विरोधी पथक पुणे यांनी फिर्याद दिली आहे. दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना गोपनीय बातमीदाराने रांजणगाव परिसरात १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांची गोडाउन पकडून देतो त्यासाठी एक लाख रुपये द्या असे सांगितले. त्याप्रमाणे पुणे दहशतवादी विरोधी पथकाने गोपनीय बातमीदार सिकंदर राम याला सिक्रेट फंडातुन एक लाख रुपये दिले. हे गोडाऊन दाखविण्यासाठी तो मुंबईहुन जुन्या महामार्गाने लोणावळा, तळेगाव दाभाडे,चाकण येथुन शिक्रापुर मार्गे रांजणगावकडे आला. परंतु गावाजवळ आला असता त्याने गाडीच्या वेग वाढविल्याने पोलिसांना फसवल्याचा संशय आला. पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून त्याला अटक केली. तसेच त्याला दिलेली रक्कम जप्त केली.  

 दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, एस. आय . पवार पोलिस पथकाने दोन टीम करून खोटी माहिती देणारे गोपनीय बातमीदार सिकंदर राम यास अटक केली आहे. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात येथे पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे करीत आहे.

टॅग्स :ShirurशिरुरPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजीMONEYपैसा