शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पेरणीची लगबग

By admin | Updated: June 6, 2015 23:36 IST

मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून, खरिपातील महत्त्वाचे असलेल्या भात पीक उत्पादकांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

पुणे : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून, खरिपातील महत्त्वाचे असलेल्या भात पीक उत्पादकांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७.८८ मि.मी. पाऊस झाला असून, मावळ तालुक्यात ३.१४ मि.मी., भोरमध्ये सर्वाधिक २४.६२ मि.मी., तर शिरूर २१.८८ मि.मी पाऊस झाला. जुन्नर आणि आंबेगावकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे ६२ हजार ३00 हेक्टरवर भातपीक घेतले जाते. ९६ हजार ५६५ क्विंटल एवढे सरासरी उत्पन्न मिळते. यंदा ६७ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले असून, यातून साधारण १ लाख २१ हजार ४३0 क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पावसाच्या अनियमततेमुळे भातउत्पादकांना फटका बसला होता. साधारण ५५ हजार ५३१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यातून ६७ हजार ९५ हजार ४४७ क्विंटल उत्पादन मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना भातपिकाने मोठा फटका दिला होता. सुमारे ५0 टक्केही उत्पादन मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने त्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, भातपेरणीची कामे सुरू केली आहे. (प्रतिनिधी)