शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'तिथं मला डाऊट होताच...' , राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पराभवावर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:01 IST

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने सणसणाटी विजयाची नोंद केली आहे

पुणे : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेल्या राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात भाजपने सणसणाटी विजयाची नोंद केली आहे. 'क' वर्ग सहकारी बॅका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव केला आहे. जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत प्रथमच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पाडाव करीत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केल्याचा इतिहास घडला आहे.यावरच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पराभवानंतर पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

''बारामतीत भाजपचा प्रदीप कंद निवडून आला आहे. मला तिथं डाउट होताच पण त्या एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो याची बारकाईने माहिती घेणार आहे. नक्की काय गडबड झाली हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.''      पवार म्हणाले,  सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे.  हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे.  

राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते

''पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत भरघोस मतांनी विजयी झाले असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले आहे.'' 

इतर तालुक्यात राष्ट्रवादीला भरगोस मते 

''एक ठिकाणी जरी पराभव झालातरीही .तरी अन्य तालुक्यात राष्ट्रवादीच्या महिला भरगोस मतांनी निवडून आली आहेत. दौंड, पुरंदर, आंबेगाव याठिकणी सुद्धा राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला असल्याचे ते म्हणाले आहेत.''  

प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे अजित पवारांनी सुनावले होते  जिल्हा बँकेच्या 'क' वर्गातून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हात या जागेसाठी चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीने कंद यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हवेली तालुक्यातूनच सहकारात दिग्गज नेते सुरेश घुलेंना मैदानात उतरवून त्यांचे आव्हान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या लढतीची दखल राष्ट्रवादी चे जिल्ह्याचे नेते अजित पवार यांनी घेऊन राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या प्रचारात प्रदिप कंद यांच्यावर शेलक्या भाषेत टिकास्त्र सोडून प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे कडक शब्दांत सुणावले होते. परंतु मतदारांनी प्रदिप कंद यांच्या पाठिमागे ठामपणे राहत दणदणीत मतांनी विजयी केले आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूकbankबँकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा