शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:15 IST

एकरकमी फीची सक्ती करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी 

ठळक मुद्देविद्यांकुर शाळा प्रशासन व मुख्याध्यापिका यांच्यावर कारवाई ची मागणी

पुणे :  नर्सरीच्या प्रवेशासाठी एक रकमी फी फरण्याची सक्ती करत पूर्ण रक्कम भरण्यासाठी गेलेल्या पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना वडगावशेरी येथे घडली. याप्रकरणी गरीब कष्टकरी पालकांना संपूर्ण फीची सक्ती करत प्रवेश नाकारणाऱ्या मुजोर मुख्याध्यापिकेसह संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांनी केली आहे.

 वडगावशेरी येथे पंक्चर दुकानात काम करणाऱ्या विठ्ठल बडे यांनी मुलगा आरूष याच्या नर्सरीच्या प्रवेशासाठी विद्यांकुर शाळेत मागील महिन्यात अर्ज दाखल केला होता. मुलाचा प्रवेश निश्चित झाला असून प्रवेशाची रक्कम भरण्यासाठी शाळेत येण्याचा मेसेज त्यांना केला. 7 फेब्रुवारी रोजी पैसे भरण्यासाठी शाळेत गेले असता प्रवेश फी मधील पैसे भरण्यासाठी सवलत मिळावी अशी विनंती मुख्याध्यापिके कडे केली होती.फीचे संपूर्ण पैसे एकरकमीच भरावे लागतील असे मुख्याध्यापिकेने खडसावून सांगितले.यानंतर बडे यांनी ही बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांना ही समस्या कथन केली. बडे यांच्या सह शाळेत जाऊन गलांडे यांनी देखील मुख्याध्यापिकेला विनंती केली. मात्र "त्या" एक रकमी फी वसूलीवर ठाम होत्या. 10 फेब्रुवारी रोजी शाळेत संपूर्ण फी भरण्यासाठी गेले असता 19 फेब्रुवारी पर्यंत फी भरण्यासाठी मुदत असल्याचे त्यांना सुरक्षारक्षकाने सांगितले.

मंगळवारी प्रत्यक्ष मुख्याध्यापिकेची भेट घेतली असता प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून आता तुम्हाला प्रवेश देता येणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ एकरकमी फी न भरल्यामुळे गरीब पालकाला आपल्या पाल्याचा प्रवेश नाकारण्यात आला. या गंभीर घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांनी संताप व्यक्त केला. पंक्चर दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाचा प्रवेश केवळ एकरकमी फी न भरल्याने प्रवेश नाकारणारे विद्यांकुर शाळा प्रशासन व मुख्याध्यापिका यांच्यावर कारवाई ची मागणी लांडे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी