शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:56 IST

साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुणे- बालेवाडी येथे कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल कोजनरेशन अवॉर्ड पुरस्कार २०२४ चे वितरण शनिवारी (दि. १९) पार पडले. माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि को-जनरेशन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, आनंदकुमार होळकर, शैलेश रासकर, एन. एच. नायकोडी, कोजन मॅनेजर एस. एस. गावडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

को-जनरेशन संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महासंचालक संजय खताळ यांच्यासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, 'विस्मा'चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डॉ. संगीता कस्तुरे, प्रकाश नाईकनवरे, बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाची भारतीय शेतीला आवश्यकता होती. कारखान्यांनी फक्त साखरेचे उत्पादन करून परवडणार नाही. त्यामुळे बायप्रोजेक्ट करण्याची आवश्यकता आहे.एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरजको-जनरेशनचे काम उत्कृष्ट आहे. राज्य सरकार सध्या सौरऊर्जेवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ऊसलागवड करून टनेज वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले. को-जनरेशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शेतीत करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस