शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे ठेवून अपघाताच्या योजना : जीवघेण्या खोड्यांनी रेल्वे त्रस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 18:29 IST

रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे किंवा इतर वस्तु ठेवून रेल्वेगाड्यांना अपघात घडवून आणण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खोडकर लहान मुलांसह काही जणांकडून अशाप्रकारे केले जाणारे हे कृत्य प्रवाशांच्या जीवावर बेतु शकते.

पुणे : रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे किंवा इतर वस्तु ठेवून रेल्वेगाड्यांनाअपघात घडवून आणण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खोडकर लहान मुलांसह काही जणांकडून अशाप्रकारे केले जाणारे हे कृत्य प्रवाशांच्या जीवावर बेतु शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झाले असून कर्मचारी व रेल्वे पोलिसांना मार्गाच्या सुरक्षेसाठी सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एप्रिल व मे महिन्यामध्ये रुकडी ते हातकणंगले रेल्वेस्थानकादरम्यान दोन वेगवेगळ््या ठिकाणी अज्ञातांकडून मार्गावर लोखंडाचे मोठे तुकडे ठेवण्यात आले होते. लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती. तसेच तळेगाव-कामशेतदरम्यानही मार्गावर लोखंडी तुकडा ठेवून हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसला लक्ष्य करण्यात आले होते. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अपघात टळल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. आप्तकालीन बे्रक लावून गाडी थांबविल्यानंतर तुकडे बाजुला काढण्यात आले. 

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देहूरोड स्थानकाजवळ मार्गावर ठेवलेला लोखंडी तुकडा लोकलच्या इंजिनला धडकला. पण कोणतीही दुर्घटना झाली नाही. नंद्रे-सांगली विभागात एकाच ठिकाणी लोखंडाचे तब्बल २० तुकडे आढळून आले होते. ही घटना आॅक्टोबर महिन्यात घडली होती. दि. २ डिसेंबर रोजी वाठार व आदरकी स्थानकादरम्यान काही मुलांनी रेल्वेमार्गातील फटींमध्ये लोखंडाचे तुकडे टाकले होते. त्याला धडक बसल्याने एका पॅसेंजरच्या इंजिनची सहा चाके मार्गावरून घसरली होती. याप्रकरणात पोलिसांनी काही लहान मुलांना ताब्यातही घेतले होते. त्यांच्या पालकांकडून हमीपत्र लिहून घेत सोडून देण्यात आले. गाड्यांचा अपघात करण्याचा हेतू यामागे असल्याचा संशय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. 

प्रतिक्रिया :मागील काही महिन्यांत अशाप्रकारच्या ८ ते १० घटना घडल्या आहेत. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पण काही खोडकर मुले व लोकांकडून जाणीपुर्वक असे प्रकार केले जात आहेत. रेल्वेगाड्यांना अपघात घडवून आणण्याचा हेतू दिसतो. रेल्वेकडून कर्मचारी व पोलिसांमार्फत मार्गावर सातत्याने लक्ष्य दिले जाते. पण नागरिकांकीही सतर्क राहण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी पुढे यायला हवे. - मिलिंद देऊस्कर, व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे  

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात