शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 20:30 IST

येरवडा येथील नेताजी हायस्कुलच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी आग लागली होती.

येरवडा : नेताजी हायस्कूल रेकॉर्ड रूम लागलेल्या आग प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शाळेची सध्याची अवस्था बघता महापालिका शिक्षण विभागाचे शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सुरक्षेसह इतर अनेक गंभीर समस्यांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच नेताजी शाळेतील समस्या कायमस्वरूपी सोडवल्या न गेल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शिक्षण प्रमुखांना देण्यात आला आहे.

येरवडा येथील नेताजी हायस्कुलच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी आग लागली होती. या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. शाळेसाठी आवश्यक निधी योग्य त्या कारणासाठी न वापरता त्याचा वापर अनावश्यक खर्चासाठी केला जात आहे. स्वच्छता, डागडुजी, सुरक्षा यंत्रणा तसेच इतर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करतात. शाळा प्रशासनाकडून वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाला लेखी निवेदन करून देखील यावर कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर सचिव तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षण प्रमुख  शिवाजी दौंडकर यांची भेट घेतली. आगीची घटना घडल्यानंतर माध्यमिक विभागाचे कोणतेही अधिकारी संध्याकाळपर्यंत शाळेत फिरकले नव्हते. शाळेतील विविध समस्यांसह आगीच्या गंभीर घटनेचे देखील गांभीर्य माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. खाते प्रमुखांनी सूचना देऊन देखील संध्याकाळपर्यंत अधिकारी शाळेत पोहोचले नव्हते. याचा थेट जाब मनसे सैनिकांनी शिक्षण प्रमुखांना विचारला. आगीच्या घटनेची चौकशी करून दोन दिवसांत शाळेला स्वतः भेट देऊन सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन शिक्षण प्रमुख दौंडकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी विभाग अध्यक्ष सुनिल कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश घोलप यांच्यासह पक्षाचे लक्ष्मण काते, मनोज ठोकळ, वंदना साळवी, कुलदीप घोडके, दत्ता माळी, जेमा चव्हाण, संतोष काते उपस्थित होते. 

टॅग्स :YerwadaयेरवडाSchoolशाळाfireआगFire Brigadeअग्निशमन दलMNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका