शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:41 IST

पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत हंगामात सर्वाधिक पावसाची टक्केवारी ही जुन्नर तालुक्यातील १४४.५ मिमी आहे. त्या खालोखाल खेड १४१.३ मिमी, भोर १३३.६ मिमी, मावळ १३३.६ मिमी, मुळशी १२४.९ मिमी, आंबेगाव १०७.४ मिमी, दौंड १०७.२ मिमी, शिरूर ९७ मिमी, इंदापूर ९४.७ मिमी, बारामती ९३.२ मिमी, हवेली ७३.७ मिमी, वेल्हा ६३.३ मिमी, तर सर्वात कमी पुरंदर तालुक्यात ५६.७ मिमी पावसाची टक्केवारी आहे. तर तेरा तालुक्यांत एकूण १४५४.२ मिमी पावसाची झाल्याने नोंद आहे. तर १११.९ टक्के सरासरी या हंगामाची आहे.जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही मावळ तालुक्यात २३१.३ मिमी झाली आहे. त्याखालोखाल जुन्नर १६०.१ मिमी, खेड १५९.४ मिमी, भोर १४४ मिमी, मुळशी १३०.५ मिमी, दौंड १२९.० मिमी, आंबेगाव ११६.७ मिमी, शिरूर ११३.४ मिमी, इंदापूर ११२.३ मिमी, बारामती १११.३ मिमी, हवेली ८४.९ मिमी, पुरंदर ६९.२ मिमी, वेल्हा ६६.३ मिमी असा तेरा तालुक्यात एकूण १६२९.२ मिमी पावसाची झाल्याने नोंद आहे. तर १२५.३ टक्के सरासरी या हंगामाची आहे.विशेषत: पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सध्या या तीन तालुक्यात अद्यापही ४५ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र गुरवारी झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत होत्या. मात्र गुरूवारी (दि. १४) या तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या २४ तासांत बारामती येथे सर्वाधिक ५०.५ मीमी, तर दौंडमध्ये ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खेड ३९.३ मिमी, आंबेगाव २८०८ मिमी, तर जुन्नर तालुक्यात २५.६ मिमी पाऊस झाला आहे.यंदा ‘बक्कळ’ पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतातून चांगले पीक मिळेल या आशेने शेतकºयांनी रोप लावली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. आॅग्सट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. दुष्काळी पट्टयात मुसळधार पाऊस झाला. बारामती, दौंड, भोर, वेल्हा, शिरूर, इंदापूर या भागात समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात बारामती येथे सर्वाधिक ५०.५ मिमी पावसाची नोंद झाली. तर दौंड येथे ४८ मिमी, खेड ३९.३ मिमी, शिरूर ३८.६, आंबेगाव २८.८ मिमी, जुन्नर २५.६ मिमी, इंदापूर १९.५ मिमी, हवेली १२.५ मिमी, पुरंदर येथे ७.४ मिमी, वेल्हा २.५ मिमी, मावळ येथे ४.३ मिमी, भोर १.८ मिमी पावसाची नोंद झाली. तर मुळशी तालुक्यात पाऊस पडलाच नाही.दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊसपावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या तीन तालुक्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र मागील आठवडाभरापासून या दुष्काली पट्टयात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठा प्रश्न मिटला आहे.गुरूवारी बारामती तालुक्यात ५०.५ मिमी, दौंड तालुक्यात ४८ मिमी, इंदापूर तालुक्यात १९.५ मिमी, तर पुरंदर तालुक्यामध्ये ७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहितीधरण प्रकल्पसाठा टक्केवारीपानशेत १०.६५ १००डिंभे १२.४९ १००पवना ८.५१ १००कळमोडी - १००चासकमान - १००आंध्रा - १००कासारसाई - १००मुळशी - १००नीरा देवघर ११.७३ १००भामा आसखेड ७.६७ १००वडीवळे - १००भाटघर २३.५० १००धरण प्रकल्पसाठा टक्केवारीघोड - १००वडज - १००वरसगाव १२.८२ १००खडकवासला १.९७ ९७.३वीर ९.४१ १०००माणिकडोह - ७५.६६पिंपळगाव जोगे - ८३.५१गुंजवणी २.१६ ५९.८१उजनी ५३.५७ १०९.३४टेमघर ३.७१ ५५.३३येडगाव - ९८.४७विसापूर - ५६.१५

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरण