शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी येथे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:33 IST

सॉफ्टवेअर इंजिनिअरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बालेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़..

पुणे : हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बालेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़. चेतन वसंतराव जायले (वय २६, रा़. बालाजी हौसिंग सोसायटी) असे त्याचे नाव आहे़. ही घटना १० एप्रिल रोजी सकाळी घडली़. याप्रकरणी त्याचा भाऊ कुंदन जायले (वय २९, रा़ ठाकुर्ली, मुंबई) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी रवी अचला आणि हेमंत खडके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन जायले हा मुळचा अकोला येथील होता.  तो कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मागील साडेचार वर्षांपासून काम करीत आहे़. मागील सहा महिन्यांपासून त्यांची टीम बदलली़. त्यामध्ये रवी आचला हे इंग्लंडमधून टीमचे काम पाहत होते़ तर हेमंत खडके हे पुण्यातून काम पाहायचे़. चेतन हा बालेवाडी फाटा येथील बालाजी हौसिंग सोसायटीत इतर मित्रांबरोबर रा़हत होता़. चेतन हा १० एप्रिलला घरीच होता़. सकाळी त्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली़. सायंकाळी त्याचे मित्र आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़. चेतन याने आपल्या सुसाईड नोटमध्ये रवी अचला आणि हेमंत खडके यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे़. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक डी़ एस़ शिंदे अधिक तपास करत आहेत़. 

टॅग्स :BalewadiबालेवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरITमाहिती तंत्रज्ञान