शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धानोरीतील सोसायटीच्या तीन बोअरवेल गेल्या चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 07:00 IST

अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते.

ठळक मुद्देरहिवासी पोलिसांत : बोअरेवल मिळवून देण्याची तक्रारीत केली मागणीधानोरी येथील पल्लाडियम ग्रँड या प्रकल्पातील रहिवाशांची पोलिसांत तक्रार दाखल

पुणे : अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते. त्यावरुन प्रशासकीय गलथानपणा विनोदी ढंगाने दाखविण्यात आला आहे. तसाच काहीसा प्रकार धानोरी येथील एका आलिशान गृहसंस्थेत घडला आहे. बांधकाम व्यावसायिकाने केवळ कागदावर दाखविलेली बोअरवेल (विंधन विहिर) शोधण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी चक्क पोलिसांकडे धाव घेतली असून, बोअरवेल परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.धानोरी येथील पल्लाडियम ग्रँड या प्रकल्पातील रहिवाशांनी विश्रांतवाडी पोलिसांत मंगळवारी (दि. २७) तक्रार दाखल केली आहे. पल्लाडियम सोसायटीमधे पाच इमारती असून, त्यात १४० सदनिका आहेत. बांधकाम व्यावसायिकाने वेळेत सोसायटी करुन दिली नाही म्हणून कागदपत्रे गोळा करताना रहिवशांना ही बाब लक्षात आली. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महानगरपालिकेला गृहसंस्थेच्या ३ बोअरवेल असल्याचे सांगितले होते. तशी कागदपत्रे देखील त्यांनी सादर केली. मात्र, प्रत्यक्षात गृहसंस्थेच्या आवारामधे बोअरवेलच नाही. गृहसंस्थेतील सदस्य विश्वास चव्हाण, दिनेश चंद, प्रशांत पाटील यांच्यासह काही रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिका विरोधात विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पल्लाडियम प्रॉपर्टीज, श्रेयस शेल्टर व रावजी कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी गृह प्रकल्पाचे काम केले आहे. पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी महापालिकेकडे नवी पेठेतील श्रीराम बोअरवेल्सचे प्रमाणपत्र जोडले. महापालिकेच्या अधिकाºयांनी पाहणी करुनच पूर्णत्वाचा दाखला दिला असेल. संबंधित प्रकल्पात महापालिकेचा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकर आणि बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा करण्याचे हमीपत्र संबंधित बांधकाम व्यावसायिकांने दिले होते. आम्ही रहिवासी २००८ पासून येथे रहात आहोत. मात्र, परिसरात आम्हाला बोअरवेल दिसली नाही. महापालिका मात्र तीन बोअरवेल असल्याचे म्हणते. त्यामुळे या बोअरवेल चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे आमच्या बोअरवेल मिळवून द्याव्यात अशी विनंती संस्थेतील रहिवाशांनी तक्रारीत केली आहे. तक्रारदार विश्वास चव्हाण म्हणाले, बांधकाम व्यावसायिकाने दावा केल्या प्रमाणे आमच्या गृहसंस्थेच्या आवारात बोअरवेल दिसून येत नाही. आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही बोअरवेलचे पाणी मिळालेले नाही. कागदोपत्री मात्र बोअरवेल असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. ---संबंधित सोसायटीमधे बोअरवेल होते की नाही याबाबत शंकाच आहे. महापालिकेने मात्र संबंधितांना परवानगी दिलेली दिसते. मात्र संबंधित गृहसंस्थेने पाण्यावर केलेला खर्च महापालिकेच्या संबंधित अधिकाºयाकडून वसूल करावा. -विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे-------------------------

टॅग्स :PuneपुणेDhanoriधानोरीtheftचोरी