शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विद्यापीठात उभी राहणार सोशल लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:27 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर करण्यात येणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर करण्यात येणार आहे.जागतिक स्तरावरील या प्रकल्पासाठी युरोपिअन युनियनने १० लाख युरो इतका निधी संमत केला आहे. सोशल इनोव्हेशन फॉर लोकल इंडियन अँड इस्राइली कम्युनिटीज अँड ग्रॅज्युएट आंत्रप्रिन्युअर्स (सिलिस) असे युरोपिअन युनियनने मंजुरी दिलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासहित भारतामधील इतर चार संस्थांना सिलिस लॅब उभारण्यासाठी निधी मिळणार आहे. भारतासहित इस्राईलमधील पाच संस्थांचा यामध्ये समावेश आहे. तेल हाई अ‍ॅकॅडेमिक कॉलेज या इस्राईलमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेसही या प्रकल्पाद्वारे निधी दिला जाणार आहे.समाजामधील विविध आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाययोजनांच्या संकल्पना मांडण्यासाठी लॅब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लॅबच्या माध्यमामधून विचार व संकल्पनांच्या आदान प्रदानास वाव मिळणार आहे. याचबरोबर, सोशल इनोव्हेशन व आंत्रप्रिन्युअरशिप हे दोन घटक केंद्रस्थानी ठेवून नव्या व्यावसायिक संकल्पना मांडता येतील, अशी माहिती या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विजय खरे यांनी दिली.ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठ, जर्मनीतील बर्लिन टेक्निकल विद्यापीठ, क्रोएशियातील युनिव्हर्सिटी आॅफ अप्लाईड सायन्सेस आणि पोर्तुगालमधील लिस्बन विद्यापीठ या जगप्रसिद्ध संस्थांनाही सोशल इनोव्हेशनसंदर्भातील संकल्पना मांडण्यासाठी युरोपिअन युनियनकडून आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.या लॅबच्या माध्यमामधून सौरऊर्जा व इतर पर्यायी ऊर्जा संसाधने, स्वच्छ भारत मोहीम आदी प्रमुख आव्हानांना प्राधान्य दिले जा जाणार आहे. यासह इतर क्षेत्रांतील इनोव्हेटिव्ह संकल्पना शोधण्यासाठी विविध स्टार्टअप्सबरोबर काम करण्याची या केंद्राची तयारी असल्याचे विजय खरे यांनी स्पष्ट केले.इंटरनॅशनल सेंटरमध्ये २० एप्रिल रोजी कार्यशाळाइंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये येत्या १८ एप्रिलला आंत्रप्रिन्युअरशिप यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाच्या कॉन्स्टंझ गेरहार्ड्स यांचेव्याख्यान होणार आहे. यामध्ये परदेशातील इतर तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ