शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना भावी पंतप्रधान, मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 06:51 IST

बारामती तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली.

बारामती : शिवसेना आणि भाजपा एकाच माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे भाजपामुळे २५ वर्षे सडली, असं सांगतात. मग त्यांच्यासोबत कशाला राहता. यांचं नेमकं काय चाललंय, हेच कळत नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. तसेच, कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये, असेही म्हटले.

बारामती तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली. यावेळी पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण होतं. या पाडापाडीमुळेच आमची माती झालीय, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.पवार म्हणाले, की कार्यकर्त्यांनी अगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल, यावर लक्ष द्यावे. पाच राज्यांतील निवडणूक निकालात भाजपाची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूरमातूर उत्तरं देत आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शेवटी कुणी काय करावं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचेदेखील पवार यांनी नमूद केले....अटेन्शन...ब्रेकिंग न्यूजअजित पवार यांच्या भाषणादरम्यान त्यांचा मिश्कीलपणा अनेक वेळा नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी अनुभवला आहे. आज प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनीदेखील पवार यांच्या मिश्कीलपणाचा प्रत्यय घेतला. पणदरे येथील कार्यक्रमात पवार यांनी भाषणादरम्यान वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, अजित पवार काय बोलतात, यावरच लक्ष असतं. अटेन्शन... ब्रेकिंग न्यूज... असं म्हणत मिश्कील टिपणी केली. पवार यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेShiv Senaशिवसेना