पुणे : राजाराम पुलाचे एक्सपान्शन जॉइंटचे काम करण्यासाठी पुलाची एक बाजू महिनाभरासाठी बंद करण्यात येणार आहे. ही बाजू बंद केल्यानंतर काय परिणाम होणार आहे, त्याची ट्रायल घेण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने नदींवरील विविध पूल व शहरातील उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये ११ पुलांचे बेअरिंग व एक्सपान्शन जॉइंटचे कामे करावी लागणार आहेत. त्यानुसार प्रकल्प विभागाने पूना हॉस्पिटल, एस. एम. जोशी आणि संगमवाडी येथील पुलाचे काम केले आहे. राजाराम पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटचे काम केले जाणार आहे. या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक महिना बंद करून हे काम केले जाणार आहे. त्यानंतर दुसरी बाजू बंद ठेवून दुसऱ्या बाजूचे काम केले जाणार आहे. दोन्ही बाजूचे काम किमान दोन महिने चालणार आहे. हे काम करण्यापूर्वी पुलाची एक बाजू बंद करून दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजूंची वाहतूक सोडल्यानंतर काय परिणाम होणार आहे, त्याची ट्रायल घेण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.