...तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल; उद्धव ठाकरेंची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:15 PM2022-02-14T16:15:53+5:302022-02-14T16:16:04+5:30

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले

So the name of Savitribai Phule Pune University will be taken with respect all over the world Expectations from Uddhav Thackeray | ...तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल; उद्धव ठाकरेंची अपेक्षा

...तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल; उद्धव ठाकरेंची अपेक्षा

Next

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. 'विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न राहता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत. जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल. अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

''सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले आहेत.''  

 कार्यक्रमात व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान  परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले 

 देश आणि समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले. आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

कोश्यारी म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारनेचे काम केले. त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला. परंतु कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.  

Web Title: So the name of Savitribai Phule Pune University will be taken with respect all over the world Expectations from Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.