शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भटक्या श्वानांना बसवणार मायक्रो चिप; महापालिकेच्या अभिनव योजनेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:26 IST

भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवल्यावर या प्रणालीमुळे प्रत्येक कुत्र्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होणार

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व महापालिकांना भटक्या श्वानांच्या संख्येवर प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर, पुणे महापालिकेने श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसह मायक्रोचिप बसविण्याची अभिनव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत, शुक्रवारी (दि. ७) कात्रज येथील नसबंदी शस्त्रक्रिया केंद्रात तीन भटक्या श्वानांच्या प्रथमच मायक्रोचिप बसविण्यात आल्या.

या संदर्भात, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत भटक्या कुत्र्यांना नसबंदी शस्त्रक्रिया करताना त्यांच्यात मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मायक्रोचिपच्या माध्यमातून प्रत्येक कुत्र्याची ओळख, रंग, ठिकाण, नसबंदी शस्त्रक्रियेची तारीख, लसीकरणाचा दिनांक, तसेच संबंधित संस्था आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे भटक्या श्वानांचे संगोपन, पुनर्लसीकरण आणि रेबीज नियंत्रणाच्या कामात अधिक पारदर्शकता आणि अचूकता येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या निर्णयास मान्यता दिली असून, महापालिकेसोबत कार्यरत असलेल्या सर्व संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिये दरम्यान मायक्रोचिप बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एका प्राणीप्रेमी महिलेच्या सहकार्याने मोहम्मदवाडी व हडपसर परिसरातील तीन भटक्या श्वानांच्या त्वचेमध्ये प्रथमच मायक्रोचिप बसविण्यात आल्या आहेत. या मायक्रोचिप प्रणालीमुळे प्रत्येक कुत्र्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे, लसीकरणाचा मागोवा घेणे आणि त्याच त्या श्वानांवर पुन्हा नसबंदी होण्याचा धोका टाळणे सोपे होणार आहे. या उपक्रमामुळे ‘रेबीजमुक्त पुणे’ या मोहिमेला मोठा हातभार लागणार आहे.

स्वयंसेवी संस्थेमार्फत भटक्या श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसोबत मायक्रोचिप बसविण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागांतील सुमारे ६०० भटक्या श्वानांमध्ये मायक्रोचिप बसविण्यात येणार आहे. त्यानंतर स्कॅनिंगद्वारे त्यांचे निरीक्षण व परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच शहरातील सर्व भटक्या श्वानांमध्ये मायक्रोचिप बसविण्यासाठी खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - डॉ. सारिका भोसले-फुंडे, पशुवैद्यक अधिकारी, पुणे महापालिका.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune to Microchip Stray Dogs; Innovative Municipal Scheme Begins

Web Summary : Pune Municipal Corporation starts microchipping stray dogs alongside sterilization. Each microchip will digitally store dog's details aiding in tracking, vaccination and rabies control. The initiative begins with 600 dogs.
टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdogकुत्राSocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिकdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल