शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:47 IST

इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची काळजी आहे..

ठळक मुद्देदंडाच्या रकमेतुन ग्रामीण भागात कोरोना चाचण्या सुरु करा 

बारामती : सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे आज माणूस अन्नाला देखील महाग झाला आहे .तो दंड कूठून भरणार ? माय बाप सरकार इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची चिंता आहे. तरी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी. दोन वर्षात दंडाच्या पावत्यामधून जमा केलेल्या रकमेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सूरू करावी,अशा शब्दात भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

याबाबत गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना तपासणी व दंडात्मक कारवाई बद्दल राज्यात सुरू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग यामुळे सामान्य जणता घाबरली आहे. व्यापारी, तथा लघू उद्योजक, तसेच घरातील रूग्णांनमुळे बाहेर पडणारा सामान्य नागरिक हा गेले वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाउन मुळे पुर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे.

आता संसर्ग वाढत असून रूग्णसंख्या वाढली आहे.या काळात व्यापारी, शेतमाल विक्रेते यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.निर्णय चांगला आहे परंतू लाखो लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक तपासणी केंद्र आहे .त्यामुळे तेथे तपासणी करता लोक जमल्यास गर्दी होत असून तपासणी साठी आलेल्या बरयाच लोकांना वारंवार तपासणी न करता परत जावे लागत आहे. यामुळे लोक तपासणी ला टाळाटाळ करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, तसेच महत्वाच्या कामासाठी इच्छा नसतानाही घराबाहेर पडलेलले लोक हे बॅकेचे हप्ते,जागाभाडे, लाईट बिल, दवाखान्याचा खर्च यामुळे मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे त्याची आवक बंद झाली आहे .तरी देखील आपल्या आदेशाने यांच्या वर सर्रास दंडात्मक कारवाई केली जात आहे.आरोग्य केंद्र नसेल त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. काही कारणास्तव  विना मास्क बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यावर मोफत मास्क देण्याची सोय करावी.या पत्राद्वारे आम्ही आपणास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सध्याच्या परिस्थितीत निर्माण होत असल्याने अडचणींनवर तातडीने मार्ग काढण्यासाठी विनंती करीत आहे. दम्याचा त्रास असणारा मास्क मध्ये गुदमरतोय .तरी तो घरा बाहेर का पडतोय ? हे सगळं आपूलकीने जाणून घेण्याची गरज आहे .त्याची कारणे नक्कीच डोळे पाणावणारी आहे.मुख्यमंत्रीसाहेब या पत्राचा राजकारण म्हणून विचार न होता सहानभूतीने विचार करावा,अशी मागणी वाकसे यांनी केली आहे.————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा