शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर...; संजय राऊतांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:42 IST

महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून कुरघोडीचे राजकारण होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे.

खेड : गेल्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे.तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहे. तसेच खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे. 

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी थेट खेड गाठत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. याचवेळी त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर  नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी असेल किंवा नसेल खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, असंं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी खेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक कुरघोडीच्या राजकारणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असे खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. खेडच्या आमदारांना त्यांनी वेसण घालण्याची गरज आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागते. एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असं अलिखित करार असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

काय आहे नेमकं प्रकरण ?खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची खैरात झाली होती.

टॅग्स :KhedखेडSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMLAआमदार