शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून ते सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात: गृहमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 15:31 IST

आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणारच आहेत.

ठळक मुद्देभिडे, एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई होईल... 

पुणे : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. अर्थातच ते जे काही महाविकास आघाडीसरकारविषयी बोलणार ते विरोधातच असणार आहे. याचमुळे फडणवीस यांच्या टीकेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. 

पुण्यातील येरवडा कारागृहाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपणाची जबाबदारी असल्याने ते आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणार आहेत. परंतू, फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण टीका करण्यापाठीमागे त्यांचे दुकान बंद होऊ नये हेच कारण आहे. म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात.

येरवडा कारागृह भेटीदरम्यान देशमुख यांना कारागृह प्रशासनाकडून विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. ......... भिडे, एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई होईल... कोरेगाव दंगलीच्या संदर्भात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांच्याविरुद्ध चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे. त्याचप्रमाणे माजी न्यायमूर्ती  व एल्गार परिषदेचे आयोजक असलेल्या बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याविषयीची माहिती घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखyerwada jailयेरवडा जेलMilind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीState Governmentराज्य सरकार