शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्यमंत्री महोदय, आमचं काही चुकलं का? पुणे पालिकेच्या सभागृह नेत्याने मांडली पत्राद्वारे कैफियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:45 IST

शहरात आरोग्यव्यवस्था उभी करताना आम्ही कधीही हात पसरले नाहीत.उलट ३५० कोटींहून अधिक निधी कोरोनाविरोधातील लढाईत खर्च केला आहे.

पुणे:  पुण्यासह इतर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी पुणे पार पाडत असेल तर पुण्याला आवश्यक असलेली मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची नाही का? शहराला रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा करताना पुण्यावरील वाढीव जबाबदारीचा विचार व्हायला नको का?इतर शहरांना आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होतो, तसा तो पुण्यालाही व्हावा, असे आम्हाला वाटले, तर आमचे काही चुकते आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राद्वारे विचारले आहे.

कोरोनाच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या लढाईत राज्य सरकारकडून आवश्यक असलेल्या मदतीचा कोणताही हात पुढे आलेला नाही. रेमडेसिव्हर इंजेक्शन कोटा, पुरेसा ऑक्सिजन यासह लसीकरणासाठी लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून मिळत नसल्याची कैफियत पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मांडली आहे. 

बिडकर पत्रात म्हणतात, पुणेकर मागील वर्षीच्या १४ मार्चपासून कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. मुंबईपेक्षा अधिक गंभीर स्थिती पुण्यात आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत पुणे पालिकेने तक्रारीचा कोणताही सुर न लावता आपले कर्तव्य पार पाडण्याचीच भूमिका घेतली आहे. शहरातील आरोग्यसेवा भक्कम केली. परिणामी देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक बेड्स आणि व्हेंटिलेटर बेइस विकसित करण्यात पुणे अव्वल शहर ठरले आहे.

मुंबई, दिल्ली, बेंगळुरू चार मेट्रो सिटींच्या तुलनेत दर दहा हजार नागरिकांच्या मागे सर्वाधिक 'सीसीसी' बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स पुण्यात विकसित झाले, हे आम्ही अभिमानाने सांगतो. हे सर्व करताना राज्य सरकारचा मदतीचा भक्कम हात कधीही पुढे आला नाही. 

शहरात आरोग्यव्यवस्था उभी करताना आम्ही कधीही हात पसरले नाहीत. कोठून तरी निधी मिळेल, याची आशाळभूतपणे वाट न पाहता, ३५० कोटींहून अधिक निधी करोनाविरोधातील लढाईत पुणे महापालिकेने खर्च केला आहे. शहरातील उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबर मोट बांधून आम्ही कोरोना संकटाशी झुंजतो आहे. वैद्यकीय सुविधांमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून पुण्यात उपचारासाठी धाव घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे असेही ते म्हणाले.........

गंभीर कोरोनास्थिती लक्षात घेता, शहराला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.  वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तातडीने करून देण्याबरोबरच लसीकरणासाठी पुण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. - गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे