इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 08:01 PM2019-10-07T20:01:54+5:302019-10-07T20:04:01+5:30

पुणे विभागातून राज्याबाहेर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच शयनयान सेवा आहे.

sleeper coach Shivshahi will run for Indore | इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही

इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही

googlenewsNext
ठळक मुद्दे ही बस दररोज सायंकाळी पाच वाजता पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून सुटेल.. खासगी बससेवेशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने अनेक नवीन बदल वातानुकूलित व शयनयान वातानुकूलित या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून पिंपरी-चिंचवड ते इंदौर दरम्यान नवीन वातानुकूलित शयनयान शिवशाही बससेवा सुरू केली आहे. ही बस दररोज सायंकाळी पाच वाजता पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून सुटेल, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. पुणे विभागातून राज्याबाहेर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच शयनयान सेवा आहे.
खासगी बससेवेशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने अनेक नवीन बदल केले आहेत. शिवशाही बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करण्यात एसटी यशस्वी ठरत आहे. वातानुकूलित व शयनयान वातानुकूलित या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटीने राज्याबाहेरही विविध मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये इंदौरसह बडोदा, अहमदाबाद, गोवा, हैद्राबाद आदी ठिकाणी पुण्यातून बस सोडल्या जातात. पण आतापर्यंत शयनयान बससेवा कोणत्याही मार्गावर धावत नव्हती. ही पहिली सेवा इंदौर मार्गावर सुरू केली आहे. त्यामुळे आता इंदौर मार्गावर दररोज सकाळी शिवाजीनगर स्थानकातून वातानुकूलित बैठी व सायंकाळी पिंपरी-चिंचवड येथून वातानुकूलित शयनयान शिवशाही धावत आहे. 
वातानुकूलित बैठी बससेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शयनयान सेवा सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड स्थानकात सायंकाळी ५ वाजता व इंदौर येथूनही याच वेळेत बस सुटणार आहे. आगाऊ आरक्षणासह १२१० रुपये तिकीट दर ठेवला आहे. बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी दोन एलईडी स्क्रीन बसविले आहे. मोबाईल चार्जरची सुविधाही उपलब्ध आहे. आगाऊ आरक्षणाची सुविधा सर्व एसटी बसस्थानकावर केली आहे. तसेच एसटीचे मोबाईल अ?ॅप व मान्यताप्राप्त खासगी एजंटमार्फतही आरक्षण करता येईल, अशी माहिती जोशी यांनी दिली. 

Web Title: sleeper coach Shivshahi will run for Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.