शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

New Year Motivation: बासष्ठीतील तरुण करताेय राेज सिंहगडाची सफर; तब्बल १५१ वेळा चढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 13:00 IST

अवघ्या ४५ ते ५० मिनिटांतच गड पूर्ण करतात

अजित घस्ते

पुणे : सिंहगड एकदा पायी सर करायचा म्हटलं तरी तरुणाईच्याही अंगावर काटा येताे. अनंत अगरखेडकर हा ६२ वर्षाचा ‘तरुण’ मात्र अपवाद ठरत आहे. शारीरिक चपळाई आणि तंदुरूस्तीच्या जाेरावर ३ ऑगस्ट २०२२ पासून ते दरराेज सिंहगड पायी चढत आहेत. गतवर्षात त्यांनी १५१ वेळा सिंहगड सर केला आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम कायम ठेवत सलग २२३ वेळा सिंहगड सर करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

पुण्यातील एका बांधकाम कंपनीतून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक अनंत अगरखेडकर यांनी ३ ऑगस्ट २०२२२ पासून सिंहगड किल्ला पायी सर करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांच्या १५१ फेऱ्या पूर्ण झाल्या. त्या २२३ वेळा सलग पूर्ण करण्याचा त्यांचा नववर्षाचा संकल्प केला आहे.या संकल्पपूर्ततेनिमित्त मित्रमंडळाने जल्लोष करण्यासाठी मोठी तयारी केली होती. यामध्ये सिंहगड परिवार, यंग सिनिअर सायकलिस्ट ग्रुप, सह्याद्री भ्रमण मंडळ, मूनलाईट वॉकिंग ग्रुप आदी संघटनांचे सदस्य आणि त्यांचा मित्र परिवार सोबत होते. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या १०० हून अधिक सदस्यांनी त्यांच्यासमवेत गड सर करून साथ देत असतात.

अगरखेडकर हे मूनलाईट वॉकिंग ग्रुपचे संस्थापक-सदस्य आहेत. रोजच्या चालण्याच्या व्यायामासोबत ते मित्रांसमवेत आठवड्यातून तीन दिवस तळजाई टेकडीवर जातात. दर पौर्णिमेला रात्री १२ वाजता राजाराम पुलापासूनच सिंहगडापर्यंत व संपूर्ण सिंहगड पायी चालत सर करीत असतात. तर, वर्षातून एकदा लोणावळा-पुणेदरम्यान चालत ते भटकंती पूर्ण करतात.

राेजचा असा आहे दिनक्रम

सकाळी पहाटे ५ वाजता राजाराम पुलावरून पीएमपी बसने प्रवासाला सुरुवात करतात. तर सिंहगड पायथ्याला पावणेसात वाजता पोहोचतात. ते ७ वाजता गड चढायला सुरुवात करतात. अवघ्या ४५ ते ५० मिनिटांतच गड पूर्ण करीत पावणेआठ वाजता गडावर पाेहोचतात. तेथे १० मिनिटे थांबून पुन्हा ८ वाजता खाली उतरायला सुरुवात करतात. ३० मिनिटांतच खाली येऊन पुन्हा पावणेनऊच्या बसने पुण्यात येतात.

धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने आरोग्याकडे विशेष लक्ष द्या 

नव्या पिढीत चालण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने सलग २२३ दिवसांचा संकल्प केला आहे. त्यापैकी गेल्या वर्षात १५१ फेऱ्या सलग पूर्ण झाल्या आहेत. या प्रवासात कधी एकटा होतो तर कधी अनोळखी मित्र हाेते. या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, हीच अपेक्षा आहे. -अनंत अगरखेडकर, सिंहगड ट्रेकर

टॅग्स :PuneपुणेSenior Citizenज्येष्ठ नागरिकsinhagad fortसिंहगड किल्लाTrekkingट्रेकिंगHealthआरोग्य