शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:12 PM

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी देशभरात १०९ मार्गांवर १५१ रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देप्रत्येक मागार्साठी निविदा प्रक्रियेतूनच खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली जाणार

पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १०९ मार्गांवर खासगी रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित केले असून त्यामध्ये पुण्याला सहा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. पुणे ते दिल्लीसह पटना, भोपाळ, हावडा, प्रयागराज व दिब्रुगढ या मार्गांचा समावेश आहे. यामधील पुणे ते दिल्ली रेल्वे दररोज सोडण्याचे प्रस्तावित असल्याचे समजते.रेल्वेमार्गांच्या खासगीकरणाला मागील वर्षीपासून सुरूवात झाली आहे. आता त्याला वेग आला असून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी देशभरात १०९ मार्गांवर १५१ रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली. यामध्ये खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित आहे. त्यासाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक मागार्साठी निविदा प्रक्रियेतूनच खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली जाणार आहे. या गाड्यांच्या तिकीट दराबाबत अद्याप अनिश्चिता असली तरी रेल्वेकडूनच दर निश्चित केले जातील, असे समजते.दरम्यान, प्रस्तावित खासगी रेल्वेगाड्यांमध्ये पुण्यालाही सहा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. या मार्गांमध्ये पुणे-दिल्लीचा समावेश असून ही गाडी दररोज सोडण्याची प्रस्तावित आहे. पुणे ते भोपाळ ही गाडी आठवड्यातून तीनदा सोमवार, गुरूवारी व शनिवारी, पुणे ते हावडा ही गाडी आठवड्यातून दोनदा गुरूवार रविवारी सुटू शकेल. तर पुणे ते पटना सोमवार व गुरूवारी, पुणे ते प्रयागराज मंगळवार, गुरूवार व शनिवारी आणि पुणे ते दिब्रुगढ ही गाडी रविवारी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातून मिळणाºया प्रतिसादावर या गाड्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार