शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईत ‘सिक्स पॅक’ची वाढतेय क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:29 IST

कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे आहे. त्यामुळे अवाच्या सवा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ‘जिम इन्स्ट्रक्टर’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुणे : गेल्या काही वर्षांत तरुणाईमध्ये ‘सिक्स पॅक,’ ‘एठ पॅक’ची क्रेझ निर्माण झाली असून त्यासाठी  ‘जिम’कुशल प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याची काळजी योग्य प्रकारे कशी घ्यावी, याबाबत अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिकशास्त्र विभागाने जिम मॅनेजमेंट व जिम इन्स्ट्रक्टर हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असून त्यास व्यायामाची आवड असणाऱ्या व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात ‘जिम इंडस्ट्री’ जोर धरू लागली आहे. त्यातही प्रामुख्याने तरुणाईचे ‘जिम’ला जाण्याचे फॅड वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील विविध भागात आधुनिक व्यायाम साहित्य असणाºया सुसज्ज जिम सुरू झाल्या आहेत. कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे आहे. त्यामुळे अवाच्या सवा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. परंतु, जिमचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि जिम सुरळीतपणे चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळेच विद्यापीठाने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन हा अभ्यासक्रम विभागाला चालवावा लागत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी विभागातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.  विद्यापीठाच्या शारीरिकशास्त्र विभागातर्फे ‘जिम इन्स्ट्रक्टर’ व ‘जिम मॅनेजमेंट’ हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. बारावी उत्तीर्ण किंवा बारावीस समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमास १८ ते ६० वय असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. तसेच तीन महिन्यांच्या या अभ्यासक्रमास केवळ ५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देऊन मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आवश्यक प्रशिक्षण देण्यात येते.  प्रामुख्याने आयटी, बँकिंग क्षेत्रातील किंवा केवळ कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वजन वाढणे, दम लागणे, पोट सुटणे, सांधेदुखी आदी आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बहुतांश कर्मचारी ‘जिम’च्या पर्यायाचा विचार करून दररोज व्यायामाला जाण्याचे नियोजन करतात. परंतु, प्रत्येकाला दररोज व्यायामाला जाणे शक्य होत नाही. अलीकडच्या काळात तरुणांबरोबरच जिमला जाणाऱ्या तरुणींची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुरुष इन्स्ट्रक्टरबरोबरच आता जिममध्ये महिला इन्स्ट्रक्टर असल्याचे पाहायला मिळते, असे शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील अधिकाºयांनी सांगितले........विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातर्फे जिम मॅनेजमेंट आणि जिम इन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात आहे. त्यात व्यायामाचे प्रकार, आहारशास्त्र, व्यायामशाळेचे व्यवस्थापन व शारीरिक क्षमता याबाबत मार्गदर्शन केले जाते. - डॉ. दीपक माने, शारीरिक शिक्षणशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यStudentविद्यार्थी