शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

पीएमपी च्या ई-बससाठी आणखी सहा आगार  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 7:00 AM

देशातील पहिले ई-बस आगार म्हणून पीएमपीच्या भेकराईनगर आगाराला मान

ठळक मुद्देपुढील काही दिवसांत याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार एवढ्यावरच न थांबता पीएमपीच्या ताफ्यात आणखी ५०० ई-बस टप्याटप्याने दाखल होणार‘पीएमपी’ प्रशासनाने ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात पुढील काही महिन्यांत आणखी ५०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे नव्याने सहा आगार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चार आगारांसाठी आवश्यक जागाही ‘पीएमपी’ला मिळाली असून उर्वरीत दोन जागाही लवकरच मिळतील. त्यानुसार पुढील काही दिवसांत याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देशातील पहिले ई-बस आगार म्हणून पीएमपीच्या भेकराईनगर आगाराला मान मिळाला आहे. त्यापाठोपाठ निगडी आगारातही केवळ ई-बस दिल्या आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १२० ई-बस आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ मीटर लांबीच्या आणखी ३० बस मिळणार आहेत. एवढ्यावरच न थांबता पीएमपीच्या ताफ्यात आणखी ५०० ई-बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. त्यापैकी ३५० बस दोन्ही महापालिकांमार्फत तर १५० बस केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेअंतर्गत भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. या बससाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ३५० बसची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच या बस ताफ्यात येण्यास सुरूवात होईल. सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर ई-बस मार्फत शहर वाहतुक देशातील कोणत्याही शहरात होत नाही. त्यामुळे पुण्यातील ई-बसच्या कार्यक्षमतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभूमीवर ‘पीएमपी’ प्रशासनाने ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नव्याने सहा आगारांची उभारणी केली जाणार आहे. या आगारांमध्ये भेकराईनगर व निगडी प्रमाणे केवळ ई-बस असतील. सध्या पीएमपीचे एकुण १३ आगार आहेत. नवीन आगारांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील प्रत्येकी तीन जागा निश्चित केल्या आहेत. पुणे कार्यक्षेत्रामध्ये बाणेर, वाघोली व सुतारवाडी येथे तर पिंपरी चिंचवडमध्ये चºहोली, पिंपळे सौदागर व भोसरी-मध्यवर्ती केंद्र येथील जागांचा त्यामध्ये समावेश आहे. वाघोली येथील ३ एकर जागेमध्ये सर्वाधिक ११५ बस पार्किंगची क्षमता आहे. भोसरी येथे सर्वात कमी २ एकर जागा असून तिथे ६० बस पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यातील बहुतेक जागा पीएमपीला मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याठिकाणी सुविधा उभारण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. ----------------

दुसºया टप्यातील ३५० बीआरटी ई-बससाठीडेपोचे नाव         क्षेत्र (एकर)    बस पार्किंग क्षमताबाणेर स. नं. १११    २.५०        ९५वाघोली        ३.००        ११५चºहोली स.न.१२९,१३०    ३.५०        ७०पिंपळे सौदागर        ३.००        ७०----------------------------------------‘फेम’ योजनेतील १५० बीआरटी ई-बससाठीडेपोचे नाव        क्षेत्र (एकर)    बस पार्किंग क्षमतासुतारवाडी-पाषाण सूस     ३.००        ९०रोडभोसरी-मध्यवर्ती सुविधा    २.००        ६०केंद्र------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे