शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत संपले १६.४७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 02:03 IST

पाणी बचत करण्याची गरज : ९.७७ टीएमसी शिल्लक; कपात होण्याची शक्यता

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसर आणि जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १६.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा गेल्या सहा महिन्यांत संपला आहे. धरण प्रकल्पात सध्या केवळ ९.७७ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, त्याचा वापर पुढील साडेतीन महिने करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाने पाठ फि रविल्यामुळे पुणे जिल्ह्याला भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट चित्र आॅक्टोबर महिन्यातच दिसू लागले होते. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाण्याचा वापर सर्वांनी जपून करणे अपेक्षित होते; मात्र ३० आॅक्टोबर २०१८ पासून ३१ मार्च २०१९ या सहा महिन्यांत धरणातील तब्बल १६.५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. त्यातील काही पाणी ग्रामीण भागाला शेतीला सोडण्यात आले, तर उर्वरित पाणी पुणे महापालिकेकडून उचलण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीच चांगलीच खालवली असून, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.गेल्या काही महिन्यात पाणी वापरावरून पुणे महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. पुढे हा वाद महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेला. प्राधिकरणाने पालिकेला नियमानुसार पाणी वापरण्याचे आदेश दिले; मात्र प्राधिकरणाने आदेश देऊनही पालिका नियमानुसार पाण्याचा वापर करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला अनेकवेळ जपून पाणी वापरण्याचे लेखी पत्र पाठवले; परंतु, पालिकेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. पालिकेकडून अधिकाधिक ११५० एमएलडी पाणी वापरावे, असा प्रस्ताव जलसंपदाने ठेवला होता; मात्र पालिका १३५० एमएलडी व त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करत आहे.पालिकेकडून पाण्याचा वापर कमी करण्याबाबत हालचाली होत नाहीत आणि जलसंपदा विभाग पालिकेला थांबविण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळेच काही शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली; मात्र काही कारणास्तव याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली; परंतु या बैठकीस पालिकेच्या अधिकाºयांनी दांडी मारली. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगितलेजात आहे.खडकवासला धरण प्रकल्पातील६ महिन्यांची पाणीसाठ्याची आकडेवारीदिनांक पाणीसाठा३१ मार्च २०१९ ९.७७२८ फेब्रुवारी २०१९ ११.६८३१ जानेवारी २०१९ १४.७१,३१ डिसेंबर २०१८ १७.७८३० नोव्हेंबर २०१८ २०.५८३० आॅक्टोबर २०१८ २६.२३बाष्पीभवनामुळे घटणारपाणीपातळीखडकवासला धरण प्रकल्पात सध्या ९.७७टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असला, तरी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांच्याअंदाजानुसार १५ जुलैपर्यंत १.३९ टीएमसी एवढ्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ९.७७ टीएमसी पाणीसाठा दिसून येत असला, तरी पिण्यासाठी व शेतीसाठी केवळ ८.३८ टीएमसी एवढेच पाणी वापरण्यासाठी मिळणार आहे.भीमा खोºयातील धरणांमधील पाणीसाठाधरण टक्केवारीतपिंपळगाव जोगे ६.६८माणिकडोह ९.९१येडगाव ११.१०वडज ९.३६डिंभे १९.७०घोड ०.००विसापूर १.०५कळमोडी २१.४७चासकमान १७.६७भामा आसखेड २९.१८वडीवळे ५५.१२आंद्रा ६७.५४पवना ३९.७६धरण टक्केवारीतकासारसाई ४१.१६मुळशी ३१.२३टेमघर ०.००वरसगाव ३२.०४पानशेत ४३.४९खडकवासला ५१.९९गुंजवणी ३३.२६नीरा देवधर २४.८२भाटघर ३७.७९वीर ५०.३०नाझरे ०.०उजनी (उणे ) - १८.७६

टॅग्स :PuneपुणेDamधरण