सहा महिन्यांत संपले १६.४७ टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:59 AM2019-04-01T01:59:56+5:302019-04-01T02:03:50+5:30
पाणी बचत करण्याची गरज : ९.७७ टीएमसी शिल्लक; कपात होण्याची शक्यता
पुणे : पुणे महानगरपालिका व परिसर आणि जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १६.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा गेल्या सहा महिन्यांत संपला आहे. धरण प्रकल्पात सध्या केवळ ९.७७ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, त्याचा वापर पुढील साडेतीन महिने करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाने पाठ फि रविल्यामुळे पुणे जिल्ह्याला भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट चित्र आॅक्टोबर महिन्यातच दिसू लागले होते. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाण्याचा वापर सर्वांनी जपून करणे अपेक्षित होते; मात्र ३० आॅक्टोबर २०१८ पासून ३१ मार्च २०१९ या सहा महिन्यांत धरणातील तब्बल १६.५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. त्यातील काही पाणी ग्रामीण भागाला शेतीला सोडण्यात आले, तर उर्वरित पाणी पुणे महापालिकेकडून उचलण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीच चांगलीच खालवली असून, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.
गेल्या काही महिन्यात पाणी वापरावरून पुणे महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. पुढे हा वाद महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेला. प्राधिकरणाने पालिकेला नियमानुसार पाणी वापरण्याचे आदेश दिले; मात्र प्राधिकरणाने आदेश देऊनही पालिका नियमानुसार पाण्याचा वापर करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला अनेकवेळ जपून पाणी वापरण्याचे लेखी पत्र पाठवले; परंतु, पालिकेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. पालिकेकडून अधिकाधिक ११५० एमएलडी पाणी वापरावे, असा प्रस्ताव जलसंपदाने ठेवला होता; मात्र पालिका १३५० एमएलडी व त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करत आहे.
पालिकेकडून पाण्याचा वापर कमी करण्याबाबत हालचाली होत नाहीत आणि जलसंपदा विभाग पालिकेला थांबविण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळेच काही शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली; मात्र काही कारणास्तव याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली; परंतु या बैठकीस पालिकेच्या अधिकाºयांनी दांडी मारली. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगितले
जात आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील
६ महिन्यांची पाणीसाठ्याची आकडेवारी
दिनांक पाणीसाठा
३१ मार्च २०१९ ९.७७
२८ फेब्रुवारी २०१९ ११.६८
३१ जानेवारी २०१९ १४.७१,
३१ डिसेंबर २०१८ १७.७८
३० नोव्हेंबर २०१८ २०.५८
३० आॅक्टोबर २०१८ २६.२३
बाष्पीभवनामुळे घटणार
पाणीपातळी
खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ९.७७
टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असला, तरी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांच्या
अंदाजानुसार १५ जुलैपर्यंत १.३९ टीएमसी एवढ्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ९.७७ टीएमसी पाणीसाठा दिसून येत असला, तरी पिण्यासाठी व शेतीसाठी केवळ ८.३८ टीएमसी एवढेच पाणी वापरण्यासाठी मिळणार आहे.
भीमा खोºयातील धरणांमधील पाणीसाठा
धरण टक्केवारीत
पिंपळगाव जोगे ६.६८
माणिकडोह ९.९१
येडगाव ११.१०
वडज ९.३६
डिंभे १९.७०
घोड ०.००
विसापूर १.०५
कळमोडी २१.४७
चासकमान १७.६७
भामा आसखेड २९.१८
वडीवळे ५५.१२
आंद्रा ६७.५४
पवना ३९.७६
धरण टक्केवारीत
कासारसाई ४१.१६
मुळशी ३१.२३
टेमघर ०.००
वरसगाव ३२.०४
पानशेत ४३.४९
खडकवासला ५१.९९
गुंजवणी ३३.२६
नीरा देवधर २४.८२
भाटघर ३७.७९
वीर ५०.३०
नाझरे ०.०
उजनी (उणे ) - १८.७६