शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मामाच करीत होता १५ वर्षांच्या भाचीचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:41 IST

शाळेतील समुपदेशकामुळे  प्रकार आला उघडकीस

ठळक मुद्देकाहीशा डिप्रेशनमुळे १५ वर्षाची मुलगी घरी येण्यास तयार नसे  वानवडी पोलिसांनी मामाला केली अटक

पुणे : शनिवार रविवार घरी असल्यानंतर तो भाचीला धमकावत असे. तुझी शाळा बंद करेल, घराबाहेर फिरणे बंद करेल, असे धमकावुन तो तिच्यावर अत्याचार करीत असे. त्यामुळे ही १५ वर्षाची मुलगी घरी येण्यास तयार नसे. काहीशी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्या मैत्रिणीला तिची ही अवस्था लक्षात आल्यावर तिने या मुलीला खोदून खोदून विचारले. तेव्हा आपला मामा करीत असल्याचे अत्याचाराची माहिती तिने मैत्रिणीला दिली. या मैत्रिणीने शाळेतील समुपदेशकांना हे सांगितले. त्यांनीही गंभीरपणे ही गोष्ट घेऊन या मुलीला विश्वासात घेतले. तिच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर ते या मुलीला थेट वानवडी पोलीस ठाण्यात घेऊन आला. वानवडीपोलिसांनी या मुलीच्या मामाला अटक केली आहे. याप्रकरणी १५ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या आॅगस्ट २०१९ पासून सुरु होता. वानवडी पोलिसांनी पोस्को तसेच बलात्काराच्या कलमाखाली मामावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हांडेवाडी येथील ही मुलगी शिकण्यासाठी होस्टेलवर राहते. शनिवार, रविवारी घरी येते. ३१ वर्षाचा तिचा मामा हा उत्तर प्रदेशातील मुळचा राहणारा असून तो या मुलीच्या घराजवळच राहतो. ही मुलगी घरी आल्यावर त्याने तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याशी गप्पा मारत असे. त्यानंतर त्याने तिला तुझी शाळा बंद करील़ घरातून बाहेर फिरणे बंद करील. खेळणे बंद करेल, अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध करण्यास सुरुवात केली. त्याच्या धमकीमुळे तिने ही बाब कोणाला सांगितली नाही. संधी मिळेल, तेव्हा तो तिच्यावर जबरदस्ती करु लागला. त्यामुळे शनिवारजवळ आला की ही मुलगी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. हे होस्टेलमधील तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले. तिने विचारल्यावर आपल्यावर मामा करीत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. तिने शाळेतील समुपदेशकाला ही बाब सांगितली. त्यांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर या मुलीने मामाचे सर्व कृष्ण कृत्ये सांगितली. वानवडी पोलिसांनी मामाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक