पुणे : पोलीस आयुक्त डॉ़. के़ व्यंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे हे मुलांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत होती़. त्याचवेळी एक मुलगा उभा राहिला आणि त्याने विचारले सर, अपहरण झाले तर मुलाने काय केले पाहिजे?अचानक आलेल्या या थेट प्रश्नाने पोलीस अधिकारीही क्षणभर अवाक झाले़. मुलाचा हा प्रश्न अगदी योग्य आणि सर्वांनाच त्याविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे जाणून सह आयुक्त शिसवे यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येत असतात़. त्यावेळी सर्व प्रथम तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करावा़. तुमचे अपहरण करणारे तुमच्यापेक्षा अधिक ताकदवान असतील़. तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा़. अपहरणकर्ते काय बोलतात, कोणाशी बोलतात, याचे निरीक्षण करा़. त्याचवेळी या संकटातून तुम्ही निभावून जाऊ, असा विश्वास मनात बाळगा़. तुमचे अपहरण हे घरातून, रस्त्यावरुन केले जाण्याची शक्यता आहे़. त्यावेळी आजूबाजूला कोणी आहे का, हे पहा़ तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचू शकत असेल याची खात्री असेल .तर सर्वप्रथम आरडाओरडा करा़, असा कठीण प्रसंग तुम्ही पार केला तर तुम्ही हिरो व्हा़, सहआयुक्त शिसवे यांनी ज्या सहजपणे अशा प्रसंगात कसे वागावे, हे सांगितल्यानंतर मुलांनी एकच टाळ्यांचा गजर करत त्यांना प्रतिसाद दिला़. निमित्त होते, बालदिनानिमित्त पुणे शहरातील विविध शाळांमधील मुलांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयाला भेट देण्याचे़ पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी व त्यांना प्रश्न विचारण्यासाठी मुले तयारी करुन आल्याचे दिसून येत होते़. मुलांनी अगदी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीपासून थेट आयोध्या प्रकरणाचा निकालाला लागलेल्या उशीराबद्दल विविध प्रश्न विचारले़.
सर, अपहरण झाले तर काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 07:00 IST