शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'साहेब नुकतीच गाडी लावली होती',... पुण्यात पोलिसांनी सामानासहितच उचलली दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:44 IST

महिलेने विनंती करूनही वाहतूक पोलिसच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे

पुणे : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पोलीस कारवाई दरम्यान एक दुचाकी सामानासहित गाडी उचलल्याचे समोर आले आहे. महिलेने विनंती करूनही वाहतूक पोलिसच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा गाडी उचलल्याचा व्हिडिओ जोरदार धुमाकूळ घालत आहे.  

पुण्यातील नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाई दरम्यान क्रेनच्या सहाय्याने दुचाकी ही चालकासहित उचलण्यात आली होती. तरुणाने अशीच दोन मिनिटासाठी गाडी लावली होती. असे तो त्यावेळी सांगत असतानाही पोलिसांनी विलंब न करता तातडीने गाडी उचलली होती. तसाच प्रकार लक्ष्मी रस्त्यावर घडलेला आहे. या घटनेचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता दोघे जण खरेदीसाठी दुचाकीवरून आले होते. यावेळी पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून ते खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्‍या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली. यावेळी दुचाकीमध्ये खरेदी केलेले साहित्य ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली.

साहेब नुकतीच गाडी लावली होती... 

पोलीस गाडी उचलताना दिसताच दोघे धावत आले. आणि त्यांनी पोलिसांना विनंती करण्यास सुरुवात केली. ‘साहेब नुकतीच गाडी लावली होती. आमच्या साहित्याचं नुकसान होईल. आमची गाडी सोडा’ अशी विनंती केली. पण काही केल्या वाहतूक ;पोलिसांनी ऐकले नाही. या कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी गाडी सोडून दिली.

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकPoliceपोलिसonlineऑनलाइनSocial Viralसोशल व्हायरल