शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहनचोरांस अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 23:28 IST

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती.

धायरी - ट्रकमधील मालासह दोन वाहने चोरी करणाऱ्या चार वाहनचोरांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २१ हजार ३५९ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. रविंद्र अंकुश लष्करे (वय: २६, संभाजी नगर, बेनकरवस्ती, धायरी, पुणे), शंकर बाळू ढेबे (वय:२२), सोमनाथ चंद्रकांत नरळे (वय:२५) आणि भरत रमेश वाघ (वय: ३०) हे राहणार सदाशिव नगर, बारंगळी मळा, धायरी, पुणे या चार वाहनचोरांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता फुटेजच्या आधारे पोलीस शिपाई धनाजी धोत्रे व योगेश झेंडे यांना ट्रक चोरी करणारे धायरी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता यापूर्वीही त्यांनी एक छोटा हत्ती वाहन व एक दुचाकी चोरले असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन एक ट्रक मालासह, एक छोटा हत्ती वाहन, एक दुचाकी असा एकूण १५ लाख २१ हजार ३५९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

ट्रक चोरून नेला ताम्हिणी घाटात... -बंद अवस्थेत उभा असलेला ट्रक चोरांनी नवले पुलाखालून चालवीत ताम्हिणी घाटात नेला. ट्रक मध्ये स्टिलचा ८ लाख रुपये किंमतीचा माल असल्याने चोरांनी तेथील एका व्यापाऱ्याशी संपर्क केला. मात्र व्यवहार न झाल्याने त्यातील एकाच्या गावी तो माल उतरवून ट्रक दूरवर नेऊन त्यांनी ट्रकची चाके काढली होती. मात्र सीसीटिव्ही फुटेजमुळे चोरटे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसThiefचोर