शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

By राजू इनामदार | Updated: February 24, 2025 19:15 IST

लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत

पुणे: लोकसभेत राज्यात चांगले यश मिळवणाऱ्या व नंतर विधानसभा निवडणुकीत मात्र फटका बसलेल्या काँग्रेसच्या पुण्याची अपयशाची साखळी काही तुटायला तयार नाही. लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत. महापालिकेच्या येत्या निवडणुकीआधीच पक्षांतर करून घेण्याच्या मागे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहेत.

एका माजी आमदाराच्या नावाची जोरदार चर्चा सध्या शहरात आहे. विधान परिषद किंवा म्हाडाचे अध्यक्षपद, महापालिकेच्या १५ ते २० जागा व शहराध्यक्षपद अशी मागणी या आमदाराने शिवसेना (एकनाथ शिंदे( पक्षाकडे केली असल्याचे समजते. सध्या पुण्यात शिंदेसेनेकडे फारशी राजकीय ताकद नाही. उद्धवसेनेतून ५ नगरसेवक बाहेर पडले, मात्र त्यांनी शिंदेसेनेला पसंती न देता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिंदेसेनेकडे सध्या तरी शहरात मोठा चेहरा नाही. शहराध्यक्ष असलेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी ‘मिशन टायगर’ राबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळायला तयार नाही.ही राजकीय स्थिती ओळखूनच काँग्रेसच्या त्या माजी आमदाराने, माझ्याकडे जबाबदारी द्या, मी शहरात पक्ष वाढवून दाखवतो, अशी ऑफर दिली असल्याचे समजते. शिंदेसेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठांबरोबर त्यांच्या प्राथमिक बैठका झाल्या, त्यात त्यांनी शहरात तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर भाजपबरोबर छुपी राजकीय लढाई करावी लागेल व ती मीच करू शकतो, असे सांगितले असल्याची माहिती मिळाली. माझा राजकीय फायदा पक्षाला मोठी राजकीय ताकद मिळवून देईल, असेही या माजी आमदाराने सांगितले असल्याचे कळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची सगळी माहिती गेली असून तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

युवक काँग्रेसचे रोहन सुरवसे हेही पक्ष सोडण्याच्या भूमिकेत आले असल्याचे बोलले जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. पक्षातील जुने नेते नव्यांना पुढे येऊ देत नाहीत, राजकीय संधी दिली जात नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

धंगेकर पक्ष सोडणार नाहीत

सुरवसे कोण आहेत ते मला माहितीही नाही, माजी आमदार म्हणून बोलले जाते ते रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात आहे, मात्र ते काँग्रेस सोडतील याचा मला विश्वास नाही. कारण पक्षाने त्यांना अनेकांना डावलून बऱ्याच मोठ्या संधी दिल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाऊन ते स्वत:ची राजकीय विश्वासार्हता सध्याच्या काळात धोक्यात आणणार नाहीत, असा मला विश्वास आहे - अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस

मतभेद आहेत, पण पक्ष का सोडू?

माझ्या बाबतीत दुसऱ्या पक्षात जाणार वगैरे जे बोलले जाते ते निखालस खोटे आहे. माझा तसा मुळीच विचार नाही. काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे, अनेक नेते आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, त्यामुळेच मतभेद असणार, आहेत. पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत. मीही सोडणार नाही.- रवींद्र धंगेकर, माजी आमदार, काँग्रेस

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी