शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी उच्च शिक्षित व मोठ्या पदावर काम करीत असल्याने दैनंदिन खर्च भागवण्यास सक्षम;न्यायालयाने पोटगीचा अर्ज फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: June 7, 2025 20:14 IST

कौटुंबिक न्यायालयाने पत्नीस १ लाख रुपयांची अंतरिम पोटगी देण्यास नकार दिला.

पुणे : पत्नी उच्च शिक्षित व मोठ्या पदावर काम करीत असल्याने तिचे मासिक उत्पन्न चांगले आहे. त्यामुळे पत्नी तिचा दैनंदिन खर्च करण्यास सक्षम आहे,  असे निरीक्षण नोंदवित कौटुंबिक न्यायालयाने पत्नीस १ लाख रुपयांची अंतरिम पोटगी देण्यास नकार दिला.  पत्नीने अर्जात म्हटले आहे की, १० डिसेंबर २०१७ रोजी विवाह होण्यापूर्वीच, पतीने एक फ्लॅट खरेदी करताना त्यांच्याकडून दीड लाख रुपये डाऊन पेमेंट घेतले, मात्र फसवणूक करून फ्लॅटची नोंदणी केवळ स्वतःच्या नावावर केली. लग्नाचा खर्च १२ लाख २६ हजार ५०० रुपये त्यांच्या पालकांनी केला होता आणि लग्नात मिळालेले त्यांचे सर्व स्त्रीधन (सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू) पतीच्या ताब्यात आहे. २०२० ते २०२२ या काळात पती नोकरीविना असताना, त्यांनीच आपल्या पगारातून आणि बचतीतून घराचे आणि गाडीचे हप्ते भरले.

मात्र, आता पती त्यांच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीतून दरमहा ५ लाख रुपये निव्वळ नफा आणि केरळमधील रबर शेतीतून वर्षाला १० लाख रुपये नफा कमावत असून, त्यांची एकूण वार्षिक अंदाजित कमाई ७० लाख रुपये आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे दरमहा १ लाख रुपये पोटगी देण्यात यावी.  जेणेकरून आपला दैनंदिन खर्च भागवू शकेल. मात्र, पती यांच्या वकिलांनी अॅड. मयूर पी. साळुंके, अॅड. अजिंक्य पी. साळुंके, अॅड. अमोल पी. खोब्रागडे, अॅड. पल्लवी म. साळुंके या अर्जाला विरोध केला.पतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, पती हे त्यांच्या वृद्ध पालकांचा एकुलता एक मुलगा असून; पतीवर त्यांचे वृद्ध पालक यांची सर्वस्वी जबाबदारी आहे. पत्नी या स्वतः दरमहा दीड लाख रुपये कमवतात. त्यामुळे पोटगीची गरज नाही. पत्नीने पतीच्या उत्पन्नाबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावा केला, कारण त्यांच्या नावावर एवढ्या संपत्तीच्या नोंदीच नाहीत. पत्नी यांच्या आर्थिक उत्पन्नावर कुठलीही जबाबदारी नाही. तसेच पत्नीने पतीवर आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार ची केस, महिला संरक्षण केंद्र येथे पोलिस तक्रारी आणि गुन्हा देखील दाखल केलेले आहेत. बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने पत्नीचा पोटगीचा अर्ज फेटाळला.  

न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनावश्यक पोटगी अर्जांविरोधात एक मजबूत उदाहरण ठरू शकतो. फक्त गरज  असल्यासच आर्थिक मदत दिली जावी, अतिशयोक्तीवर आधारित अर्ज न्यायालये स्वीकारणार नाहीत.  पोटगी योग्य व पारदर्शकतेच्या आधारावर दिली पाहिजे. अर्ज फेटाळल्याने, योग्य आर्थिक मदतीला न्याय मिळेल आणि दिशाभूल करण्याचा कोणताही प्रयत्न अयशस्वी ठरेल. तसेच पोटगीची रक्कम ठरवण्यासाठीपती-पत्नीचे शिक्षण आणि आर्थिक दुर्बलता- सबलता लक्षात घेणे गरजेचे आहे - अॅड. अजिंक्य पु. साळुंके व अॅड मयूर साळुंखे , पतीचे वकील 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय