बारामती-मोरगाव रस्त्यावर एकाच वेळी चार वाहनांचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 23:38 IST2021-02-18T23:38:00+5:302021-02-18T23:38:29+5:30
accident : मोरगाव बारामती रस्त मेडद नजिक पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. या वाहनांमधील लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बारामती-मोरगाव रस्त्यावर एकाच वेळी चार वाहनांचा अपघात
बारामती : बारामती मोरगाव रस्त्यावर मेडदजवळ एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चार वाहने रस्त्यावर उलटली. यामध्ये २ पिकअप, १ तवेरा आणि १ ईको कारचा समावेश आहे. या अपघातात आज चार वाहने अपघातग्रस्त झाली.
मोरगाव बारामती रस्त मेडद नजिक पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. या वाहनांमधील लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अंधार असल्याने अपघातग्रस्ताची संख्या समजू शकली नाही. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर डॉ.काळे यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविल्या. त्यामुळे अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे शक्य झाले.
बारामती तालुका पोलिसही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यातच भरधाव वेगाने वाहने चालविल्यने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद नव्हती.