शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:19 IST

राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची काँग्रेसच्या केंद्रीय श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबतचा आपला सविस्तर अहवाल श्रेष्ठींना दिला आहे. त्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. तरुणांना वाव देण्याबरोबरच नवे, राजकीय पार्श्वभूमी नसलेले चेहरे देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच सूचना केली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. येत्या आठ दिवसांतच याबाबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.पक्षाला राज्यात लोकसभेला अनपेक्षित यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वधारला. मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले. त्यावरही चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याचे समजते. विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली.त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. ती दूरच राहिली; उलट दारुण पराभव झाला. त्यामुळे तेही पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला.त्यावरून केंद्रीय स्तरावरच संघटनात्मक बदलांचा निर्णय झाला. पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संमतीनंतर या बदलांची प्रक्रिया सुरू होणार आहे. राहुल यांनी पक्षासाठी नवे चेहरे देताना ते तरुण असतील, पक्षाबरोबर निष्ठावान असतील, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेले नसतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे सांगण्यात येते.काँग्रेसच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावर तर बदल अपेक्षित आहेच, पण शहर व जिल्हा स्तरावरही हा बदल झिरपावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मोठी शहरे व जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली तर संघटनेचे अस्तित्वच राहिले नसल्याने हा पराभव झाला असल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच फक्त प्रदेशातच नाही तर शहरे व जिल्हा, तालुका स्तरावरही खांदेपालट केली जावी, अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024