शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग, ४० ते ५० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:08 AM

कुरकुंडी (ता. खेड) येथील ओम सुपर मार्केटला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्वच माल भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक यामध्ये काही प्रमाणात भाजून जखमी झाले आहेत.

पाईट - कुरकुंडी (ता. खेड) येथील ओम सुपर मार्केटला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्वच माल भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक यामध्ये काही प्रमाणात भाजून जखमी झाले आहेत.कुरकुंडी (ता. खेड) येथील धनराज शुकलाल गुगळीया यांच्या ओम सुपर मार्केट या दुकानास सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते पाहण्यासाठी गेले असता अचानक आगीचा भडका झाल्याने ते त्यामध्ये जखमी झाले.या वेळी लागलेली ही आग ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ती विझविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आतमध्ये खाद्यतेलाचे डबे असल्याने आग विझविण्यामध्ये ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेरीस राजुरुनगर नगर परिषदेची व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक गाड्या आल्यानंतर रात्री ९.३० वा. आग आटोक्यात आली.जीवितहानी नाहीसुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीमध्ये सर्वच माल जळून खाक झाला. पश्चिम भागातील ते सर्वांत मोठे होलसेल दुकान होते. आगीच्या झळा घर आणि गोडाऊनलाही लागल्या. यामध्ये दुकानाची इमारतही पूर्ण जळाली असून, तिचे नुकसान सोडता दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये दुकानाचे मालक जखमी झाले असल्याने आज पंचनामा करता आला नसल्याने नुकसानीचा प्राथमिक अंदाज येऊ शकला नाही.या बाबत त्यांचे बंधू भागचंद शुकलाल गुगळीया यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस हवालदार मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टॅग्स :fireआगPuneपुणे