शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

सामर्थ्याची नवी ओळख : श्रिती दक्ष एनडीएतील पहिली महिला सिल्व्हर मेडलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 07:14 IST

...हे तर निस्सीम समर्पणाचं प्रतीक : पालकांची भावना

पुणेःराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत महिलांनी प्रवेश मिळवणं हेच मोठं पाऊल होतं; पण त्यापुढे जाऊन इतिहास घडवणं हे केवळ धाडसाचं नव्हे तर, निस्सीम समर्पणाचं प्रतीक असल्याची भावना श्रिती दक्ष हिच्या पालकांनी व्यक्त केली. ३० वर्षापूर्वी मीही याच प्रवासातून सुरुवात केली आहे. मात्र, माझ्या मुलीने माझ्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. त्यांचा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला. १४८व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड शुक्रवारी होणार असून यामध्ये १७महिला कॅडेट्स आणि ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स यांचा समावेश आहे. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. त्यामुळेच श्रितीचे हे यश संपूर्ण मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

स्वप्न आणि अथक प्रयत्न 

श्रिती नोयडामध्ये राहते. वडील निवृत्त विंग कमांडर, आई शिक्षिका, तर मोठी बहीण भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर आहे. त्यामुळे एनडीएमध्ये येण्यासाठी तिला घरातूनच प्रोत्साहन मिळत गेलं. शाळेचादेखील यात मोठा वाटा आहे. देशसेवेचा वारसा मनात घेऊन कठोर मेहनत, वेळेचे व्यवस्थापन आणि स्वतःवर विश्वास ठेवून एनडीए परीक्षेची तयारी केली. पुरुषांइतक्याच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक चाचण्या पार करत तिने एनडीएमध्ये प्रवेश मिळवला आणि ध्येय गाठल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कित्येक वर्षांपासून लष्करी सेवेला 'पुरुषप्रधान' ठरवलं गेलं; पण पहिल्यांदाच एनडीएमध्ये मुलींची भरती करण्यात आली आणि तिथून जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला. एनडीएच्या तीन वर्षाच्या अत्यंत कडक प्रशिक्षणात सातत्यपूर्ण उत्कृष्टता दाखवण्यात यश आलं. इथे शारीरिक शिबिरे, नेतृत्व प्रशिक्षण, शास्त्रास्त्र व तंत्रज्ञानाचे धडे दिले जातात. सर्वच बाबतींत मी गुणवत्ता सिद्ध केली. माझा यशात पालकांचा, एनडीएमधील संपूर्ण शिक्षकांचा आणि माझ्या गुरुवर्याचा फार मोठा वाटा आहे. - श्रिती दक्ष 

टॅग्स :nda puneएनडीए पुणेPuneपुणे