शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:23 IST

कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने

ठळक मुद्दे'श्री'ची आरती,पुजेला ५ व्यक्तींना परवानगी; हार, नारळांच्या दुकानांना बंदी गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी़महापालिकाने गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

पुणे : कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने घालण्यात आली असून ' श्रीं 'ची आरती व पुजेसाठी ५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी गणेश मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादींची दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी़ तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकाने गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेऊन निर्णयांना सर्वांनी सकारात्मक समर्थन दिले होते़ त्यानुसार पोलिसांनीगणेशोत्सवासाठी मंडळांना आचारसंहिता प्रस्तावित केली आहे. .................................

प्रतिष्ठापना आणि दर्शनगणेश मूर्ती खरेदी मंडळांनी व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने करावी़ श्रीचे आगमन व विसर्जनाच्या वेळी कमीत कमी लोक एकत्र जमतील़ मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. ज्या मंडळांची मंदिरे आहेत, त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी़ अन्य साधारण परिस्थितीत छोट्या मंडपाना परवानगी देण्यात येईल. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी. ऑनलाईन टोकन, डिजिटल पास सुविधा देताना वेळेची मर्यादा ठेवावी लागणार आहे़. रिक्षा व इतर वाहने जाण्याकरीता आवश्यक तेवढी मोकळी जागा ठेवावी. सॅनिटायझेशन करीता विविध साधने मंडळांनी ठेवावीत.................................

पूजा 

गणेशाची पूजा व आरतीसाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती हजर असतील. त्यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापर अनिवार्य आहे. गर्दी होतील, असे उपक्रम टाळावेत. आरती व पूजन मंडळांच्या कार्यकर्त्यांनीच करावी. .......................

श्री विसर्जनश्रींचे विसर्जन मंडळातच विधिवत करावे़ अन्नदान, महाप्रसाद, मिरवणूका काढता येणार नाहीत. महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था करणार नाही. आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे़ गणेश मुर्ती आणि निर्माल्य महापालिकेने घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे़ सोसायट्यांमध्ये कृत्रिम हौद तयार करुन घरगुती गणपतीचे विसर्जन करावे....................

सुरक्षासुरक्षेसाठी मंडळांनी  सर्व काळजी घ्यावी, श्रीच्या मुर्तीच्या रक्षणासाठी कमीत कमी ५ कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर असावेत..........................

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाप्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या गणेश मंडळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी आरोग्य सेतून वापरणे बंधनकारक आहे. ........४ दिवस १२ पर्यंत परवानगीगणेशोत्सवाच्या काळात पाचवा दिवस (२६ ऑगस्ट), सातवा दिवस (२८), दहावा दिवस (३१) आणि अनंत चर्तुदशी (१ सप्टेंबर) या ४ दिवशी ध्वनीवर्धक वापराला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका