शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

श्री ज्वेलर्स भिसी प्रकरण, ३६ जणांची ४२ लाख, २१ तोळ्यांहून अधिक सोन्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:35 IST

दहिवाळ दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : भिसीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धायरी परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकान मालकासह त्याच्या पत्नी विरोधात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी ३६ जणांकडून रोकड आणि सोने घेऊन तब्बल ४२ लाख ७८ हजार २०० रुपये तर, २१ तोळे वजनाचे सोने घेतले आहे. याप्रकरणी यशवंत अंबादास हबीब (३५, व्यवसाय आचारी, रा. नऱ्हे) यांनी नांदेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विष्णू सखाराम दहिवाळ व त्याची पत्नी स्वाती विष्णू दहिवाळ, अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना मे २०२४ ते २५ मे २०२५ दरम्यानच्या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत हबीब व त्यांच्या पत्नीने श्री ज्वेलर्समध्ये भिसीच्या माध्यमातून १ लाख ३० हजार रुपये गुंतवले होते. त्याशिवाय याआधी घेतलेले १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडून त्याचे १ लाख ९ हजार रुपये व आणखी १ लाख रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात भरून, ४ तोळे वजनाचे गंठण घेण्यासाठी एकूण ३ लाख ३९ हजार रुपये दहिवाळ दांपत्याकडे जमा केले. मात्र, २५ मे रोजी दुकान बंद आढळले आणि त्यानंतर दहिवाळ दांपत्य फरार झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले.

याशिवाय इतर ३५ नागरिकांनी देखील दरमहा भिसी स्वरूपात रोख रकमा व काहींनी थेट सोने आरोपींकडे गुंतवले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये आणि २१ तोळे वजनाचे सोने अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, परिसरात त्यांनी दुकानात चोरी झाल्याचा बनावही केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार दहिवाळ दाम्पत्याचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी