प्रतिसाद मिळाल्यास ‘शो’ही वाढतील
By Admin | Updated: December 12, 2014 00:19 IST2014-12-12T00:19:58+5:302014-12-12T00:19:58+5:30
कथानकापासून प्रमोशनर्पयत अनेक गोष्टीत मराठी चित्रपट आधुनिकतेकडे वळला आहे. तरीही मल्टिप्लेक्समध्ये मराठीची गळचेपी होते.

प्रतिसाद मिळाल्यास ‘शो’ही वाढतील
पुणो : कथानकापासून प्रमोशनर्पयत अनेक गोष्टीत मराठी चित्रपट आधुनिकतेकडे वळला आहे. तरीही मल्टिप्लेक्समध्ये मराठीची गळचेपी होते. हे खरे असले, तरी आता किती दिवस भांडत बसणार? आपण पारंपरिक गोष्टी बाजूला सारून हातात हात घालून काम करायला हवे. हा एक बिझनेस आहे, असा विचार करून पुढे जायला हवे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, तरी आपोआपच शो वाढवून दिले जातात, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केले.
‘प्रेमासाठी कमिंग सुन’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री नेहा पेंडसे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह अन्य कलाकारांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. (प्रतिनिधी)
निखळ मनोरंजन करणा:या या चित्रपटात रोमँटिक भूमिका असली, तरी ती वेगळी आहे. प्रत्येक चित्रपटातून मला वेगळी भूमिका करायला मिळाली आहे. कलाकार होणो हे एक गिफ्ट असते. कारण प्रत्येक भूमिकेतून एक वेगळे जग पाहायला मिळते. अतिशय कमी कालावधीत हा चित्रपट तयार झाला असला, तरी सर्वच बाबतीत चित्रपटाची बाजू वरचढ आहे. - आदिनाथ कोठारे
भूमिकेनुसार कलाकारांनी बदलायला हवे. भूमिकेची गरज होती म्हणून वजन कमी केले. हिंदी कलाकारांप्रमाणो आता मराठी कलाकारांनीही फिट राहायला हवे. तेलुगू चित्रपटसृष्टी अधिक ग्लॅमरस असली, तरी आता मराठी चित्रपटांकडेही तरूणवर्ग आकर्षित होत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटामध्ये वेळेत पाऊल टाकल्याचा आनंद आहे.
- नेहा पेंडसे
मराठी चित्रपटांचा दर्जा चांगला सुधारला आहे. हिंदीस तोडीस तोड चित्रपट मराठी बनत आहेत. या वेळी मराठी कलाकारांनी थिएटरसारख्या गोष्टींवर भांडत बसण्यापेक्षा आपल्या कामात सुधारणा करावी. प्रेक्षकांना एखादा चित्रपट भावला की तो त्याला मल्टिप्लेक्समध्येही शो मिळतात, हे अनेक चित्रपटांनी दाखवून दिले आहे. - विजय पाटकर
हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याला लग्नाच्या दुस:याच दिवशी वेगळेच वळण मिळते. त्यानंतर पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक कलाटणी देणा:या घटना घडत जातात. त्यातूनच रोमान्स आणि कॉमेडी खुलत जाते. या चित्रपटासाठी पाच निर्माते आहेत.
- अंकुर काकतकर