प्रेक्षागृहांना कमतरता कार्यक्रमांची
By Admin | Updated: December 18, 2014 04:35 IST2014-12-18T04:35:52+5:302014-12-18T04:35:52+5:30
शहरातील प्रेक्षागृहांपैकी चिंचवडमधील एकाच प्रेक्षागृहाला रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित संततुकारमनगर व भोसरीतील प्रेक्षागृह मात्र कार्यक्रम आणि रसिकांअभावी ओस पडली आहेत

प्रेक्षागृहांना कमतरता कार्यक्रमांची
सुवर्णा नवले, पिंपरी
शहरातील प्रेक्षागृहांपैकी चिंचवडमधील एकाच प्रेक्षागृहाला रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित संततुकारमनगर व भोसरीतील प्रेक्षागृह मात्र कार्यक्रम आणि रसिकांअभावी ओस पडली आहेत.
महापालिकेने शहराच्या विविध भागात उभारलेली प्रेक्षागृह उत्तम दर्जाची आहेत. सोई सुविधांची रेलचेल तरिही चांगले नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे, संततुकारामनगर येथील आचार्य अत्रे तसेच कै. अंकुशराव लांडगे या प्रेक्षागृहांमध्ये ज्या संस्थांचे नाट्य प्रयोग झाले. त्या संस्थेच्या कलाकारांनी या प्रेक्षागृहांबद्दल प्रशंसा केली आहे.
कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या नाट्यगृहांपैकी केवळ चिंचवड येथील प्रेक्षागृहात सातत्याने कार्यक्रम होतात. अन्य दोन्ही प्रेक्षागृहांकडे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांनी तसेच रसिकांनी पाठ फिरवली आहे. संत तुकाराम नगर येथील प्रेक्षागृहात चिटफंड तसेच अन्य खासगी संस्थांचा एखादा दुसरा कार्यक्रम होतो. मनोरंजनाचे कार्यक्रमही होत नाहीत. येथे खासगी शाळांच्या स्रेहसंमेलनासाठी बुकींग होत नाही.