शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:28 IST

साधरणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आली

सासवड: सासवड येथील दि.डेक्कन मर्चंट को -आॅपरेटिव्ह बॅकेंच्या पावणेदोन महिन्यापूर्वी स्थलांतरीत झालेल्या शाखेला वातानुकुलीत यंत्रणेत शाॅर्टसर्कीट होवून लागलेल्या आगीत शाखा जळून भस्मसात झाली आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास या बँकेच्या सोपाननगर रस्त्यावरील स्थलांतरीत  केलेल्या नव्या शाखेला आग लागली. आग लागल्यानंतर सासवड पोलिसांनी सासवड व जेजूरी नगरपरिषदेच्या अग्नी शमन यंत्रणेच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली. या लागलेल्या आगीमुळे बँकेतील सर्व साहित्य जळून गेलं आहे. यामध्ये मनुष्यहानी झाली नाही बँकेच्या नुकसानी बाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही. मात्र बँकेतील फर्नीचर, इलेक्ट्रीक साधने, कागद पत्रांचे  यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.   डेक्कन मर्चंट बँकेचे शाखा अधिकारी तुषार पवार यांनी याबाबत सांगितले., सकाळी साडेनऊ वाजता बँक उघडली. त्यानंतर काही मिनिटातच वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाला आणि धूर निघाला त्यानंतर आग लागून पुढील घटना घडली.  संत सोपान नगर रस्त्यावरील झेंडे बिल्डिंगमध्ये नुकतेच स्थलांतर बँकेचे झाले होते. ही घटना घडल्यानंतर सासवड पोलिसांनी एसटी बसस्थानकाकडून सोपाननगरला जाणारा रस्ता काही काळ बंद केला होता. दरम्यान आग लागल्यानंतर बँकेचे अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनला माहीती दिली व  नगरपालिकेत अग्निशामक बंब मागितला. परंतु सासवड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दुरुस्तीला गेला असल्याने उपलब्ध झाला नाही. त्यामुळे सासवड नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांना संपर्क करून त्या नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागितला. तो त्यांनी अवघ्या २५ मिनिटात बँकेजवळ पोहोचविला. त्यामुळे साधारणता दीड तासानंतर आग आटोक्यात आली. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली आहे. दरम्यान सायंकाळी बँकेचे अध्यक्ष का. दी. मोरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली आणि विविध सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :PuneपुणेfireआगbankबँकPoliceपोलिसWaterपाणी