पुण्याजवळील मांजरीत ३ दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग; २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 11:36 IST2017-10-03T11:20:19+5:302017-10-03T11:36:09+5:30
मांजरी-मुंढवा रस्त्यावर तीन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोनजण जखमी झाले

पुण्याजवळील मांजरीत ३ दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग; २ जखमी
मांजरी : येथील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील झेड कॉर्नर जवळील ग्रीनवूड सोसायटीमध्ये असलेल्या तीन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोनजण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
येथे असलेल्या एका भांड्याच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये सुमारे १५ गॅस सिलेंडर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांचा एकामागे एक असे जोरदार स्फोट झाले. त्यामुळे शेजारील इतर दोन दुकानांनाही आग लागली.
नीलेश घुले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सुरवातीला पाण्याचे टँकरद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.