शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:02 IST

आरोपी सचिन सोनवणे याने पत्नीला गळफास दिल्याचे मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओम याने पाहिले होते.

पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे आईचा खून करतांना मुलाने पाहिल्याने बापानेच पोटच्या मुलाला गळफास  देऊन खून केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. ही घटना मंगळवारी(दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लीना सोनवणे (वय३५), ओम सोनवणे (वय ७, दोघेही रा.स्वराज व्हॅली अपार्टमेंट , पाटस , ता. दौंड ) असे खून झालेल्या मायलेकांचे नाव आहे.

या प्रकरणी मयत लिनाचा पती सचिन सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन सोनवणे याने  प्रेयसीच्या मदतीने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस प्रेयसीचा शोध घेत आहेत. लीना सोनवणे यांच्यासह त्यांची मुलगी वैष्णवी (वय १०),  मुलगा ओम हे घरी होते. लीना यांनी स्वयंपाक घराच्या छताच्या पंख्याला तर ओम याने त्याच्या बेडरुममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे सकाळी वैष्णवी हिला दिसले. त्यानंतर घडलेली घटना वैष्णवीने तिच्या नातेवाईकांना कळविली.

त्यानुसार नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी भाऊसाहेब शेलार (रा. केडगाव, ता.  दौंड ) यांनी पोलिसात फिर्याद दिली. मात्र, नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी अवघ्या सहा तासात घटनेचा छडा लागला.

सचिन सोनवणे याने पत्नीला गळफास दिल्याचे मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओम याने पाहिले होते. ओम हा प्रकार सर्वांना सांगेल म्हणून त्याला ही बापाने गळफास दिला. तर वैष्णवी हा प्रकार कुणाला सांगणार नाही याची खात्री बापाला झाल्याने ती या मृत्यू कांडातून वाचली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवतचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरगोजे, रामभाऊ घाडगे, सागर चव्हाण, प्रदीप काळे, विजय भापकर यांनी भेट दिली.

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक