प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्‍पवयीन प्रेयसीकडून कोयत्याने वार, पुण्यातला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:13 AM2022-05-24T11:13:53+5:302022-05-24T11:15:05+5:30

मुख्य आरोपी प्रेयसीसह चौघेजण अल्पवयीन आहेत

shocking type of stabbing in Pune by a minor lover to avenge the murder of a lover | प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्‍पवयीन प्रेयसीकडून कोयत्याने वार, पुण्यातला धक्कादायक प्रकार

प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्‍पवयीन प्रेयसीकडून कोयत्याने वार, पुण्यातला धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पुणे : प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय प्रेयसीने 19 वर्षीय तरुणावर हातात कोयता घेऊन प्राणघातक हल्ला केला. पुण्याच्या हडपसर परिसरात रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी प्रेयसीसह चौघेजण अल्पवयीन आहेत. 

विठ्ठल धनंजय चौगुले (वय 19), ऋषिकेश उर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय 20) आणि चैतन्य तुळशीराम कराड (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर 17 वर्षीय तरुणीसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन प्रविण जगताप (वय 19) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुख्यात गुन्हेगार सनी हिवाळे याचा काही महिन्यांपूर्वी हडपसर परिसरात निर्घृण खून करण्यात आला होता. हा खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने हा सर्व कट रचला. फिर्यादी तरुण हा सनी हिवाळेच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा संशय तिला होता. यातून तिने इतर आरोपींना हाताशी धरून हा सर्व प्रकार घडून आणला. 

रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण काळेपडळ परिसरातील ढवळे फ्रुट स्टॉल जवळ थांबला होता. त्याच वेळी ती तरुणी इतर आरोपींना घेऊन त्या ठिकाणी आली आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरुण घाबरून फ्रुट स्टॉल चा दुकानात शिरला आणि त्याने शटर बंद करून घेतले. 

त्यानंतरही आरोपी प्रेयसी बंद शटरवर कोयत्याने वार करत राहीली. 'तु सनीच्या मर्डरच्या कटात सामील होता, मी तुला जिवंत सोडणार नाही, आता मला कशाची भीती नाही तसेच जर कोणी मध्ये आला तर मी कोणाला सोडणार नाही' असे म्हणून शटरवर वारंवार कोयत्याने वार करून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराने परिसरात काळेपडळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: shocking type of stabbing in Pune by a minor lover to avenge the murder of a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.