शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! इंदापुरच्या कारागृहात १७ कैद्यांसह दोन पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 19:53 IST

कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला...

ठळक मुद्देप्रशासनाचा हलगर्जीपणा नडला बारामतीच्या वकिलांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

बारामती: इंदापुरच्या उपकारागृहात १७ कै द्यांसह दोन पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कैद्यांवर ही वेळ आली आहे.याबाबत राज्य ग्राहक संरक्षण परीषद सदस्य अ‍ॅड. तुषार झेंंडे यांनी कैद्यांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तात्काळ कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. इंदापूर येथील उपकारागृहात २४ आॅगस्ट रोजी एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता .मात्र,या पॉझिटीव्ह कैद्याच्या बाबतीत संबंधित प्रशासनाने व आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेतली नाहि. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसात त्याच्या बरॅकमध्ये इतर १७  कैद्यांना व दोन पोलिसांना कोरोना ची लागण झालेली आहे. याबाबत प्रशासनाचा खूप मोठा हलगर्जीपणा आहे. तसेच १७ बाधित कैद्यांना उपकारागृहातच बरॅकमध्ये विलगीकरण केले आहेत. सामाजिक अंतराचा सोशल डिस्टन्स पूर्णपणे फज्जा उडाला आहे.             मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये कैद्याला देखील मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्याला देखील वेळेवर औषध उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरच्या ठिकाणी जेलच्या बरॅकमध्ये क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबतीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तात्काळ कारवाईसाठी तक्रार दाखल केल्याचे अ‍ॅड झेंडे यांनी सांगितले. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात बाब विनंती करण्यात आली आहे तसेच या कोरूना पॉझिटिव आलेल्या सर्व कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच मानवी हक्काचे संरक्षण करून तात्काळ विलगीकरण करून औषधोपचार देण्यात यावे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनावर आहे याची त्यांनी नोंद घ्यावी,अशी मागणी अ‍ॅड. झेंडे यांनी केली आहे.या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. तक्रारीचा क्रमांक देखील मिळाला आहे. लवकरच याबाबत कारवाईचे आदेश मिळण्याची शक्यता आहे.या तक्रारीमुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.————————————

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjailतुरुंगPoliceपोलिस