शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘बाय बाय डिप्रेशन’,'सॉरी गुड्डी! फेसबुकवर पोस्ट लिहीत कमिन्स महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 15:03 IST

सासवड परिसरातील भिवरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे : 'बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डू, सॉरी डुग्गु' अशी आपल्या मुलाला आणि पत्नीला फेसबुक पोस्ट टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासवड परिसरातील भिवरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

कमिन्स महाविद्यालयात प्रफुल्ल मेश्राम हे शिक्षक पदावर काम करत होते. मंगळवारी (दि.१३) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडी मारत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येच्या अगोदर मेश्राम यांनी फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी’ या आशयाची पोस्ट लिहिली आहे.मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते.आणि याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी सासवड पोलीस  ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावानजीक पुणे सासवड मार्गालागत असणाऱ्या शेतीमधील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. मयत प्राध्यापकाची फेसबुक पोस्ट बरोबरच लोकेशन ही शेअर केलेले होते. त्यानुसार त्यांचे मित्र याभागात त्याचा शोध घेत होते. तसेच त्यांनी सासवड पोलिसांनी  देखील ही माहिती दिली. त्यानुसार ते शोध घेत असताना त्यांच्या विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले.   त्यांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम  यांचा मृतदेह आढळून आला. 

प्रफुल्ल यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना औषध सुरू होते. त्यातच ते नैराश्यात देखील होते असे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब  घोलप यांनी सांगितले आहे.  याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी  सांगितले.

टॅग्स :JejuriजेजुरीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस