शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खळबळजनक! स्मशानभूमीत कोहळ्यावर पिन टोचलेला मुलीचा फोटो; शिरूर तालुक्यातील अघोरी प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 17:10 IST

पाबळ (ता. शिरूर) येथे स्मशानभूमीत दशक्रिया विधीला आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला.

शिक्रापूर :  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक खळबळजनक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. पाबळ (ता. शिरूर )येथील स्मशानभूमी मध्ये एक काळी पिशवी त्यावर कोहळ्यावर,त्यावर पिन टोचून लावलेला मुलीचा फोटो आणि लिंबू, कुंकूसह इतर गोष्टी वाहिलेल्या आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

पाबळ (ता. शिरूर) येथे स्मशानभूमीत दशक्रिया विधीला आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. हा प्रकार नेमका कोणी केला असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाबळच्या येथील एका आजीच्या दशक्रियेनिमित्त ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह निवृत्त जवान सुनील चौधरी व ग्रामस्थ महाराजांचे प्रवचन ऐकत होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे दोन फूट अंतरावर वरील भोपळा इत्यादी साहित्य दिसले.मात्र, दशक्रिया होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या नजरेत त्यांनी ही वस्तुस्थिती आणून दिली. यावेळी सर्वानाच हा प्रकार समजल्याने गोंधळ उडाला .यावेळी अनेकांनी या प्रकारावर भाष्य केले. मात्र,मुलीचा फोटो लावून स्मशानात असा प्रकार घडल्याचे दिसून आल्यावर भीती व्यक्त केली जात आहे.

सरपंच मारुती शेळके यांनी आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरिकांनी काही चुकीचे घडू नये यासाठी दक्ष राहावे. तसेच या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुण्यातील राजकीय गुरुवर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल सून पांढऱ्या पायगुणाची आहे, तिच्यामुळे तू आमदार मंत्री होणार नाही, असे सांगून त्यांचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे दिसून आल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलला अटक केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या साडेतीन वर्षात जादूटोणा कायद्यान्वये आतापर्यंत तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. या ११ गुन्ह्यात तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :ShirurशिरुरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती