शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून युवकाचा खून; चाकणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:27 IST

खून झालेला रोहित सहानी याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर

चाकण : चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. ६ )  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित सहानी  (वय १८, सध्या रा. चाकण ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याची चाकण पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

चाकणमधील जय महाराष्ट्र चौक येथे रोहित सहानी व त्याच्या ग्रुपमधील काही जणांचे टोळके एकत्र जमले होते. त्यानंतर दुपारी पावणे एकच्या सुमारास रोहित सहानी व आणखी एक जन एकाच दुचाकीवरून चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत आले. याच ठिकाणी दुपारी १ च्या सुमारास मोठा दगड डोक्यात घालून रोहित याचा खून करण्यात आला. पोलिसांनी काही संशयितांची नावे निष्पन्न केल्याची माहिती समोर येत आहे.  खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.  या खूनामागच्या कारणांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचक इप्पर, प्रेरणा कट्टे, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत घटनास्थळीच ठाण मांडून असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. खून झालेला रोहित सहानी याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू