शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

धक्कादायक..! मूल होत नसल्याने विवाहितेचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 3:04 PM

मुल होत नसल्याने तसेच माहेरच्या नातेवाईकांकडून सोन्याचे दागिने आणावेत यासाठी पतीसह सासू सासरे विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.

ठळक मुद्देकर्वेनगरमधील प्रकार : फाशी घेतल्याचा केला होता बनाव वारजे पोलिसांकडून पतीसह सासु सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे :  ‘त्याने ’ आधी पत्नीने खासगी भांडणातून फाशी घेतल्याचा बनाव केला. मात्र, विवाहितेच्या गळ्यावरील खुणांवरुन पोलिसांचा संशय बळावला. नंतर शवविच्छेदन अहवालामध्ये श्वास गुदमरल्याचे निष्पन्न झाले. आणि मग पोलिसांनी ‘ त्याच्या ’ कडे मोर्चा वळवत कसून चौकशी केली आणि खरे कारण उघड झाले. मूल होत नाही तसेच माहेरहून सोने आणत नसल्याने पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्वेनगर परिसरात मंगळवारी(दि.१९जुलै) दुपारी हा प्रकार घडला. रेश्मा हनुमंत कुऱ्हाडे (वय १९ रा. स्नेहांकित कॉलनी, कर्वेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे पोलिसांनी तिचा पती हनुमंत कुऱ्हाडे  (वय २५) याला अटक केली असून सासु सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रेश्माचा भाऊ लक्ष्मण वठुर (वय २२, रा. विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हनुमंत हा एका कंपनीत मोलमजुरीचे काम करतो़ लग्नानंतर तिला मुल होत नसल्याने तसेच माहेरच्या नातेवाईकांकडून सोन्याचे दागिने आणावेत यासाठी पतीसह सासू सासरे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. रेश्मा यांनी बाहेर मजुरीचे काम करून पैसे जमा केले होते. तसेच रुमभाड्याचे पैसे तिने स्वत: कडे ठेवले होते़ हे पैसे द्यावेत या कारणावरुन मंगळवारी १७ जुलै रोजी पती हनुमंत याच्यासोबत भांडण झाले होते. वादातून त्याने रेश्माचा गळा दाबून खून केला़. खासगी रुग्णालयात भांडणातून तिने फाशी घेतल्याचा बनाव रचला़. रुग्णालयातील डॉक्टरांनी तशी माहिती पोलिसांना दिली़ मात्र, गळ्यावरील खुणांवरून पोलिसांना संशय आला़ शवविच्छेदनात श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गळा दाबून तिचा खुन केल्याचे कबुल केले़. पोलिसांनी पतीला अटक केली आहे़. 

टॅग्स :Crimeगुन्हाWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिसPuneपुणे